

Pune News: महिला जर चूल आणि मूल उत्तमपणे सांभाळू शकते, तर ती स्त्री गाव, नगर परिषद, पालिकाही उत्तमपणे सांभाळू शकते, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांना होता. पवार साहेबांमुळे महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात झाली. ते मुख्यमंत्री होते त्या वेळी विधिमंडळात महिला आरक्षणाचे विधेयक आणले. आणि महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण मिळाले.
हे विधेयक मंजूर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, असे सांगितले. आणि सभागृह पहाटे चार वाजेपर्यंत चालवून महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून घेतले. आपला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने मातृप्रथम राष्ट्र आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण महत्त्वाचे आहे, त्यांना माँ जिजाऊंनी घडविले,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त मातृनाम प्रथम या कार्यक्रमात शनिवारी (ता.१७) उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्या वेळी पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास महिला आरक्षण आणि ऑपरेशन सिंदूरच्या माहिती देणाऱ्या महिला लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.’’ या वेळी तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी कविता सादर केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.