Sharad Pawar: सैन्यदलात महिला प्रवेशाचा निर्णय सार्थ ठरविला: शरद पवार

Women Impowerment: देशाचा संरक्षणमंत्री असताना सैन्य दलात महिलांना प्रवेश नव्हता. तीनही सेना दलाच्या दर आठवड्याच्या बैठकीत मी तीन वेळा मुलींना सैन्यात स्थान देण्याबाबत विचारणा केली.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Satara News: देशाचा संरक्षणमंत्री असताना सैन्य दलात महिलांना प्रवेश नव्हता. तीनही सेना दलाच्या दर आठवड्याच्या बैठकीत मी तीन वेळा मुलींना सैन्यात स्थान देण्याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी तीनही वेळा नकार दिला. चौथ्या वेळी संरक्षण मंत्री म्हणून मी स्वत: निर्णय घेतला. सैन्यामध्ये मुलींना नऊ टक्के आरक्षण सुरू केले.

सैन्य दलात शौर्य गाजवीत असणाऱ्या महिलांनी माझा तो निर्णय सार्थ ठरविल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’मधील महिला अधिकाऱ्यांच्या सहभागावरून स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेत व माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील कर्मवीर समाधी परिसरात शुक्रवारी (ता. ९) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विश्वजित कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, एन. बी. पवार, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, आजी-माजी आमदार, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, आजीव सेवक आणि प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की आपण शांतता प्रिय आहोत. युद्धाचा मार्ग आपला नाही. परंतु आपल्यावर हल्ले झाले तर, संरक्षणासाठी खबरदारी घेतोच. तीच आता घेतली जात आहे. सैन्य दलाच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. देशाच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे. सध्या सीमेवर होणाऱ्या घटनांची माहिती देण्याचे काम दोन महिला अधिकारी करत आहेत. त्यातील एक मुस्लिम आहेत. त्यातून स्पष्ट होतय की हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन हे सर्व घटक देशाच्या ऐक्यासाठी, संरक्षणासाठी पडेल ती किंमत द्यायला तयार आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar : तडीपार झालेला नेता गृहमंत्री झाला नव्हता

श्री. पवार म्हणाले, की कर्मवीरांनी तळागाळातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. शाळेचा पट कमी होत आहे. पटसंख्या कशी वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रारंभी संस्थेच्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. रयत मासिकासह विविध पत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. गुणवंत शिक्षक, प्राध्यापक, शाळांचा कर्मवीर पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सचिव देशमुख यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. सविता मेनकुदळे केले. सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com