Women Safety : महिलांना समानतेची वागणूक मिळणे गरजेचे

Gender Equality : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात शुक्रवारी (ता. २०) एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
Women Safety
Women Safety Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : महिला आर्थिकदृष्टया सक्षम होण्याबरोबरच ‘नागरी संस्कृती’त अपेक्षित असलेला दर्जा व समानतेची वागणूक महिलांना मिळणे गरजेचे आहे,असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत व्यक्त झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात शुक्रवारी (ता. २०) एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी (ता. २०) सकाळी १० ते ५ या दरम्यान कार्यशाळा झाली.

Women Safety
Women Employment : पीठ विक्रीतून हक्काचा रोजगार

कुलगुरू डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रणजितसिंग निंबाळकर, समन्वयक म्हणून डॉ. पुष्पा गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती. तर ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अर्चना गोंधळेकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा, दामिणी व भरोसा सेलप्रमुख तेजश्री पाचपुते यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.

विभागीय आयुक्त गावडे म्हणाले, की रामायण, महाभारत काळापासून कोणत्याही काळात महिलांना दोष देणे थांबविले पाहिजे. आपण आता माहिती तंत्रज्ञान युगात असून मानसिकताही आधुनिक असणे गरजेचे आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.

Women Safety
Women Entrepreneur : महिला उद्योजकांचे ‘आई’कडे दुर्लक्ष

‘महिला सुरक्षिते’ संदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. प्रशासनाच्यावतीने पुढील आठवड्यापासून शाळा, महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची नैतिक जबाबदारी कुटूंबप्रमुखांसह सर्व सदस्यांची आहे, असे कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले.

या संदर्भात विद्यापीठ स्तरावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक यांनी प्रास्ताविक केले. भरोसा सेलच्या प्रमुख तेजश्री पाचपुते यांनी स्त्रियांच्या सुरक्षितेसंदर्भातील विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात उच्च शिक्षण विभागातील संतोष थेरोकर यांनी शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ.कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन तर श्रीमती मीरा मस्के यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील विभागप्रमुख असे ३३० प्रतिनिधी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com