Women Entrepreneur
Women Entrepreneur Agrowon

Women Entrepreneur : महिला उद्योजकांचे ‘आई’कडे दुर्लक्ष

Aai Yojana : कोकण किनारपट्टीलगतच्या गावांत खानावळ, न्याहारी-निवास यांसारखे पर्यटनाशी संबंधित व्यवसायही विकसित होत आहेत, मात्र ‘आई’ योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात न आल्‍याने अनेक जण अनभिज्ञ आहेत.
Published on

Palghar News : राज्य सरकारचे महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. यामध्ये ‘आई’ ही विशेष योजना जाहीर करून त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र कोकण विभागातून योजनेसाठी फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत.

कोकण किनारपट्टीलगतच्या गावांत खानावळ, न्याहारी-निवास यांसारखे पर्यटनाशी संबंधित व्यवसायही विकसित होत आहेत, मात्र ‘आई’ योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात न आल्‍याने अनेक जण अनभिज्ञ आहेत.

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ‘आई’ या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन संचालनालयाकडे संबंधित व्यवसायांची नोंदणी असली पाहिजे. व्यवसाय महिलांच्या मालकीचा, त्‍या चालवत असल्‍या पाहिजे, पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

Women Entrepreneur
AAI Yojana : बिनव्याजी कर्ज असणाऱ्या 'आई' योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा

योजनेची जनजागृती न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोचली नसल्याची बाब समोर येत आहे. योजनेचे अर्ज कसे आणि कुठे भरायचे, याबाबत महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे.

‘महिलेकडेच मालकी हवी’

हॉटेल, रेस्टॉरंटची मालकी महिलांची असावी, ही प्रमुख अट ‘आई’ योजनेची आहे. याशिवाय त्या व्यवसायातील ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्‍या मिळवणे अपेक्षित आहे.

Women Entrepreneur
Tourism Policy : महिला उद्योजिकांना ‘आई’ चे पाठबळ

योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

  • पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज

  • १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालय भरणार

  • व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा

  • टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक

  • अर्जदारांनी पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in ऑनलाइन अर्ज करावे.

कोकणातील महिला उद्योजकांसाठी ‘आई’ योजना खूप चांगली आहे. ज्या महिलांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा आहे, त्‍यांना १५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रस्ताव सादर करताना व्याजाची हमी घेऊन बॅंकेला दिलेली व्याजाची रक्कम ही पर्यटन संचालनालय देईल. या योजनेची जनजागृती केली जात आहे.
- हनुमंत हेडे, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com