Women Impowerment : धगधगत्या निखाऱ्यांवर हाकताहेत संसाराचा गाडा

Zunka Bhakar Kendra : ४५ डिग्री तापमानातही भाकरी भाजून त्या मिळविताहेत रोजगार
Women Impowerment
Women ImpowermentAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Amravati News : अमरावती ः धगधगत्या भट्टीवर सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या शरीराचा राप काढत भाकरी भाजून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या भाग्यलक्ष्मी खऱ्या अर्थाने समाजासाठी प्ररणादायी ठरत आहेत.
जिल्हा परिषेदच्या परिसराला लागून असलेल्या फुटपाथवरच फाटक्या ताडपत्र्या बांधून बेबीताई गडलिंग, मीना नितनवरे, मीनाक्षी गडलिंग झुणका भाकर केंद्र सुरू करून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न या भाग्यलक्ष्मी करीत आहेत.

विशेष म्हणजे बाहेर ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान असतानाही त्याची पर्वा न करता धगधगत्या भट्टीजवळ बसून सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियमितपणे अगदी रविवारीसुद्धा भाकऱ्या भाजून लोकांची भूक भागविणाऱ्या बेबीताई गडलिंग यांची कहाणी समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी असल्याचे म्हणता येईल. राहुलनगर येथे विशाखा महिला बचत गटाची स्थापना करून या महिलांनी स्वतःच आत्मनिर्भर होण्यासाठी संघर्ष सुरू केला. शासनाकडून शिवभोजन थालीसारख्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी खटाटोप करीत थकलेल्या या महिलांनी अखेर पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवरच स्वादिष्ट झुणका भाकर, केंद्र सुरू केले. या भागात अनेक शासकीय कार्यालये असल्याने येथील कर्मचारी तसेच कामानिमित्त बाहेरगाववरून आलेले नागरिक या ठिकाणी आपली भूक भागवितात.

Women Impowerment
Women Impowerment : बचत गटांच्या महिला शिवून देणार गणवेष

यापैकी बेबीताई गडलिंग यांच्यावर तर त्यांच्या नातवांची सुद्धा जबाबदारी आहे. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्या नाती आजीसोबतच राहतात. त्या आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांचे शिक्षण, लग्नकार्य होईपर्यंत आपण असेच करपत राहणार असा ठाम निर्धार बेबीताई गडलिंग या भाग्यलक्ष्मीने व्यक्त केला. आपल्याला कुणी घरी थोडीच आणून देणार असा स्वतःलाच दिलासा देणारा शब्द त्यांच्या मुखातून निघतो.

जपली सामाजिक बांधिलकी
केवळ पैसे कमावणेच हा उद्देश नसावा, हे सुद्धा या तीन महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या झुणका भाकर केंद्रांच्या बाहेरच दररोज पाच ते सहा मिनरल वॉटरच्या कॅन्सचे पाणी त्यांनी सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. झुणका भाकर खायला या किंवा नका येऊ, मात्र पाणी पिऊन जा असा त्यांचा आग्रह असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com