Women Impowerment : बचत गटांच्या महिला शिवून देणार गणवेष

Self Help Group : ग्रामीण अर्थकारणासाठी शिक्षण विभागाचा निर्णय
Women Impowerment
Women Impowerment Agrowon

हेमंत पवार
Satara News :
कऱ्हाड, जि. सातारा ः शासनाने यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रापासून गणवेष शिवण्याच्या संदर्भातील धोरणात बदल केला आहे. ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांनाही गावातच गणवेष मिळावा, यासाठी आता बचत गटांकडून गणवेष शिवून घेतले जाणार आहेत. राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेष मिळणार आहेत.

संबंधित बचत गटांच्या महिलांकडून शाळेत जाऊन गणवेषाची मापे घेतली जातील. त्यामुळे विनामापाचे गणवेष बंद होऊन विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेष मिळणार आहेत. तसेच मापातील त्रुटी गावातच दूर होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेष योजनेमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले, दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेष देण्यात येत होता. परंतु आता शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुलांकरिता आता दरवर्षी दोन मोफत गणवेष देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Women Impowerment
Women Impowerment : महिला सक्षमीकरण प्रक्रिया महत्त्वाची....

शिक्षण विभागाने मागील वेळी दिलेले गणवेष निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप झाला होता. त्याच्या चौकशीची मागणीही झाली. त्याव्दारे गणवेष वितरण आणि दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे आता शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत बचत गटाच्या महिलांकडून विद्यार्थ्यांचे गणवेष शिवून घेण्याचे धोरण आखले आहे.

कापलेले कापड पुरविणार
विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्यासाठी राज्याचे कंत्राट मे. पद्मचंद मिलापचंद जैन यांना देण्यात आले आहे. त्यांना विविध मापात कापड पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राप्त कापड महिला बचतगटांना देऊन त्यांच्याकडून गणवेष शिवून घेतले जातील. या कापडाच्या बॉक्सला केंद्र सरकारच्या टेक्स्टाइल समितीचे सील असेल. प्रत्येक ६४ बॉक्समध्ये येणारा कापड बीआरसी, सीआरसी केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६४ स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बॉक्समध्ये १०० गणवेषांचे कापड असेल.

महिलांना ११० रुपये मोबदला
एक गणवेष शिवून देण्यासाठी बचत गटांच्या महिलांना ११० रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यातून महिलांच्या अर्थकारणाला गती देण्यात येणार आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
* गणवेषासाठी शाळेतच घेतली जाणार मापे
* एक गणवेष नियमित तर दुसरा स्काउट-गाइडचा
* मुलांसाठी आकाशी शर्ट व गडद निळ्या रंगाची पॅंट असणार
* मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल
* आठवीच्या विद्यार्थिनींना ओढणीसाठीही कापड पुरविणार
* गणवेष शिवण्यात काही त्रुटी असल्यास त्या बचत गट दुरुस्त करणार
* गणवेषासाठी कापड पूर्ततेसह त्याच्या अंमलबजावणीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com