शिवभोजन योजनेला  अनुदानाअभावी घरघर : सुधीर मुनगंटीवार 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवभोजन योजना सुरू केली होती. याद्वारे बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळेल, असा उद्देश होता. चंद्रपुरातील शिवभोजन थाळी चालवणाऱ्या बचत गटाच्या महिलांना चार महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही.
To Shivbhojan Yojana Lack of grant-in-aid: Sudhir Mungantiwar
To Shivbhojan Yojana Lack of grant-in-aid: Sudhir Mungantiwar
Published on
Updated on

चंद्रपूर : राज्यातील गोरगरीब जनता लॉकडाउन काळात उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवभोजन योजना सुरू केली होती. याद्वारे बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळेल, असा उद्देश होता. चंद्रपुरातील शिवभोजन थाळी चालवणाऱ्या बचत गटाच्या महिलांना चार महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे योजनेचा उद्देशालाच तडा गेला आहे, असा आरोप भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.  शिवभोजन केंद्रे निश्‍चितपणे बंद होतील. हे कोणी उद्योगपती चालवत नाहीतर बचत गटाच्या गरजू महिला चालवतात. चार महिने झाले त्यांचे पैसे दिले नाही. बिल दिले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील शिवभोजन थाळी बंद झाली आहे. याचप्रमाणे राज्यातील थाळी देखील बंद होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. 

राज्य चालवायची इच्छा नसताना..  मुख्यमंत्र्यांना राज्य चालवायची कोणतीही इच्छा नसताना जबरदस्तीने शरद पवारांनी त्यांचा हात वर केला आणि त्यांना मुख्यमंत्री केले. त्या खुर्चीवर बसल्यानंतर ते आनंदी आहेत. ते स्वतः समाधानी आहेत. पण राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात मुख्यमंत्र्यांना रुची नाही. ओबीसी आरक्षण, मराठ्यांचे आरक्षण हे मुद्दे तसेच आहेत, असे आरोपही मुनगंटीवारांनी केले. 

हे सरकारला शोभणारं नाही  नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देऊ, असे सरकारने सांगितलं होते. पण ते अजूनही शेतकऱ्यांना दिलेले नाही. निराधार योजनेचे अनुदान चार चार महिने दिले जात नाही. आमच्या त्या विधवा आणि घटस्फोटीत महिला आहेत. त्यांना चार चार महिने अनुदान दिले जात नाही. हे सरकारला शोभणारे नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com