Summer Foods : वाळवणाच्या कामात महिला व्यग्र

Summer Food Making : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यग्र आहेत.
Summer Food Making
Summer Food Making Agrowon

Purandar News : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यग्र आहेत. यामध्ये शेवया, पापड, कुरडया, सांडगे, वेफर्स, उपवासाचे साबुदाणा पापड आदी पदार्थ बनविण्यासाठीची लगबग दिसून येत आहे.

Summer Food Making
Summer Agriculture : उन्हाळी मूग, तीळ, ज्वारी लागवडीकडे कल

उन्हाळी वाळवण म्हणजे मराठमोळ्या खाद्य संस्कृतीची खास ओळख. या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळवणांच्या पदार्थांना मागणी आहे. उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचा बेत ताटात असतोच. ग्रामीण भागातील महिलांनी आजही ही परंपरा जपली आहे. एकमेकींच्या मदतीने अंगणात उन्हाच्या आधी ही कामे उरकण्याची लगबग दिसून येत आहे.

पावसाची चाहुल लागण्यापूर्वी पावसाळ्याची बेगमी करताना उन्हाळी कामे म्हणून केले जाणारे हे वाळवणाचे पदार्थ बाजारात सर्रास तयार मिळू लागल्याने शहरी संस्कृतीमध्ये अशा कामांना अभावानेच वेळ दिला जातो.

Summer Food Making
Heatstroke : नर्सरी व्यावसायिकांना बसतोय उन्हाचा फटका

ग्रामीण भागात मात्र महिलांमध्ये असे पदार्थ एकत्रित येऊन बनविण्याची लगबग दिसून येत असल्याचे कविता भुजबळ यांनी सांगितले. आम्ही महिला एकमेकींच्या मदतीने वाळवणांची कामे करत असल्याचे मनिषा पवार, भाग्यश्री पवार, शैला भुजबळ, अंजली कुमठेकर यांनी सांगितले.

दरम्यान, आडाचीवाडीमध्ये देखील वर्षभर टिकणाऱ्या उन्हाळी वाळवण कामाची लगबग सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. अंगणामध्ये महिला एकत्रित येत एकमेकींच्या मदतीने उन्हाच्या आधी ही कामे उरकत असतानाची लगबग तसेच ही कामे करताना महिलांचा व्हिडिओ करण्यात तरुणाई व्यस्त आहे. यामध्ये शीतल पवार, पूनम पवार, सुनिता पवार, मीराबाई पवार, मंगल पवार यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com