Heatstroke : नर्सरी व्यावसायिकांना बसतोय उन्हाचा फटका

Nursery Professional : गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी उन्हाच्या झळा अधिक तीव्र आहेत. याचा फटका नर्सरी व्यावसायिकांना बसत आहे.
Heatstroke
Heatstroke Agrowon

Pune News : गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी उन्हाच्या झळा अधिक तीव्र आहेत. याचा फटका नर्सरी व्यावसायिकांना बसत आहे. रोपे जिवंत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे रोपांवरील खर्चात वाढ होत आहे. सोरतापवाडी, भिवापूर, उरुळी कांचन, हडपसर परिसरातील अनेक नर्सरी चालक अडचणीत आले आहेत.

सध्या उन्हामुळे अधिक त्रास होऊ लागल्याने भाजीपाला, फुले व इतर पिकांच्या रोपांना रोज पाणी द्यावे लागत आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रोपे जगविणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच पाणीटंचाई आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे झाडे जळून जाऊ लागली आहेत. त्यामुळे नर्सरी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Heatstroke
Heat Wave : राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ

परंतु शेतकरी त्यावरही मात करून रोपे जगविण्यावर भर देत आहेत. मात्र खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत येत आहेत. पुणे शहराजवळील हडपसर परिसरात रोपाटिकांमध्ये  नर्सरी  व्यावसायिकांनी चांगली ओळख निर्माण केली आहे. हवेली तालुक्यातील सोरतापवाडीतील तरुणांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला.

Heatstroke
Summer Heat : उष्ण रात्रीचा इशारा कायम

येथून देशात नर्सरीची रोपे विशेषतः गुलाबाची रोपे जातात. परंतु पावसाळ्यात परतीच्या पावसाने गुलाबाच्या रोपांची पानगळ होऊन झाडे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नर्सरी व्यवसाय कोलमडत आहे. त्यातच मातीचे, प्लॅस्टिकचे दर, महाग झालेली खते, जागेचे वाढलेले भाडे, यामुळे नर्सरी चालविणे मुश्कील झाले आहे.

सहा वर्षांपूर्वी गुलाबाचे एक रोप १८ ते २० रुपयांना विकले जात होते. आजही तोच दर असून मजुरी, खत, माती, औषधे, जागेचे भाडे, औषध फवारणी व इतर कच्च्या मालाचे दर दुप्पट वाढले आहेत. परंतु गुलाबाच्या एका रोपाची किंमत फक्त १८ ते २२ रुपये झालेली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पटीत गुलाबाच्या रोपांना दर मिळत नाही. त्यातच उन्हामुळे मोठे संकट कोसळले आहे.
शशिकांत चौधरी, जे. एस. नर्सरीचे मालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com