Agriculture Sowing : नाशिक जिल्ह्यात अवघ्या ६ टक्के खरीप पेरण्या

Sowing Update : कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, भुईमूग पेरणी होत आहे. जिल्ह्यात जवळपास ६ टक्के खरीप पेरणी झाल्याची माहिती आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस तर काही भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. मात्र अशा परिस्थितीत पेरण्या सुरू झाले असून शिवार गजबजू लागले आहेत. ज्यामध्ये मका पेरणीचा टक्का सर्वाधिक असल्याचे पाहायला दिसून येत आहे. याशिवाय कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, भुईमूग पेरणी होत आहे. जिल्ह्यात जवळपास ६ टक्के खरीप पेरणी झाल्याची माहिती आहे.

मंगळवारी (ता. १८) अखेर अवघ्या ५.२८ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तर आतापर्यंत ३३ हजार ८९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात येवला तालुक्यात सर्वाधिक २७.९५ टक्के पेरणी झाली आहे.

Agriculture Sowing
Kharif Sowing : खरीप पेरण्या सुरू, पण हमीभावाचा पत्ता नाही

यंदाही शेतकऱ्यांनी मका, कापूस आणि सोयाबीन या पिकांना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात सर्वाधिक १८ हजार ७२१ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. मक्यापाठोपाठ सोयाबीन पिकाची लागवड झाली असून ५ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. तर ४ हजार २४४ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. कमी पावसाच्या भागात शेतकऱ्यांनी बाजरीला पसंती दिली असल्याचे दिसते. आतापर्यंत २ हजार ७०५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात येवला तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या असून त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात पेरण्या झाल्या आहेत. मालेगाव, बागलाण, निफाड व सुरगाणा तालुक्यात किरकोळ पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : गेवराईत ६० टक्के पेरा; यंदा कपाशीला प्राधान्य

जिल्ह्यात तृणधान्य पिकांचा पेरा सर्वाधिक आहे. बागलाण व सुरगाणा तालुक्यांत भाताची किरकोळ लागवड आहे. नांदगाव तालुक्यात ज्वारीचीपेरणी १५ हेक्टरवर झाली आहे. बाजरीची पेरणी येवला तालुक्यात १ हजार ७५०, नांदगाव तालुक्यात ८५२ तर मालेगाव व बागलाण तालुक्यात थोडा पेरा आहे. बागलाण तालुक्यात नाचणी पेरणी ३० हेक्टरवर आहे. मका पेरणी येवला तालुक्यात १० हजार ७०८, नांदगाव तालुक्यात ६ हजार ५४४, बागलाण तालुक्यात १ हजार २१० तर मालेगाव तालुक्यात २५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पीक प्रकार सरासरी पेरणी प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

तृणधान्य पिके ४४९८५२.८७ २१७०१.५ ४.८२

कडधान्य पिके ३६६०५.५६ ५६५४.५ १५.४५

गळीतधान्य १०९२६५ २२९४ २.१

कापूस ४६०४८ ४२४४ ९.२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com