Agriculture Land : वर्ग दोनच्या जमिनीबाबत विधानसभेतील शब्द पाळा

MLA Kailas Patil : शेतजमिनीच्या भोगवाटादार वर्ग-दोनचे रूपांतर वर्ग-एकमध्ये हस्तांतर करताना संबंधितांकडून शर्तभंगचा नजराणा फक्त एकाच वेळी भरून घेण्याबाबत स्पष्ट सूचना मुख्यमंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात दिल्या होत्या.
Agricultural Land Transactions
Agricultural Land TransactionsAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : शेतजमिनीच्या भोगवाटादार वर्ग-दोनचे रूपांतर वर्ग-एकमध्ये हस्तांतर करताना संबंधितांकडून शर्तभंगचा नजराणा फक्त एकाच वेळी भरून घेण्याबाबत स्पष्ट सूचना मुख्यमंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात दिल्या होत्या. मात्र अजूनही त्या निर्णयावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

अजूनही जेवढ्यावेळा शर्तभंग झाला. तेवढ्या संख्येने नजराणा भरण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे लवकर आदेश काढून विधिमंडळात दिलेल्या शब्द पाळावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Agricultural Land Transactions
Agricultural Land: ‘कृषी’च्या ४० हजार एकर जमीन वापरावर प्रश्नचिन्ह

याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे, की इनाम जमिनीच्या मदतमाश या प्रकारातील भोगवाटदार वर्ग- दोन जमीनीचे रूपांतर वर्ग-एक मध्ये करण्यासाठी शर्तभंग नजराणा पाच टक्के घेण्याबाबतचे विधेयक १७ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभेत मांडण्यात आले.

Agricultural Land Transactions
Agriculture Land Mismanagement: ओसाड गावची पाटिलकी!

विधेयकावर चर्चा करताना एकाच जमिनीचे हस्तांतर अनेक वेळा झालेले असल्यास अध्यादेशामधील संदिग्धतेचा आधार घेऊन अधिकारी जेवढ्या वेळेस शर्तभंग झाला असेल, तेवढ्या संख्येने नजराणा रक्कम भरावी लागेल, अशी सक्ती करत आहेत. त्यामुळे जमिनीचे हस्तांतर कितीही वेळा झाले असले तरी शर्तभंगाची नजराणा रक्कम एकाच वेळी भरून घ्यावी, अशी मागणी केली होती.

त्यावर शर्तभंग कितीही वेळा झाला असता तरी एकाच वेळी पाच टक्के नजराना रक्कम भरून ही जमीन वर्ग एकरमध्ये रूपांतरित करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र या आश्‍वासनानुसार अजून महसूल विभागाने आदेश न काढल्यामुळे शेतकरी व नागरिकांची अडचण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com