Aahilyanagar Agriculture Festival : अहिल्यानगरमध्ये कृषी महोत्सव होणार का? ; शेतकऱ्यांना पडलाय प्रश्‍न; अजून तरी हालचाली दिसेनात

Agriculture Exhibition : शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी कृषी महोत्सवातून व्यसपीठ मिळते. यंदा मात्र कृषी महोत्सव होण्याबाबत अजून कृषी विभागात कोणत्याही दिसत नाहीत.
Aahilyanagar Agriculture Festival
Aahilyanagar Agriculture FestivalAgrowon
Published on
Updated on

Aahilyanagar News : अहिल्यानगर ः शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी कृषी महोत्सवातून व्यसपीठ मिळते. यंदा मात्र कृषी महोत्सव होण्याबाबत अजून कृषी विभागात कोणत्याही दिसत नाहीत. त्यामुळे या वर्षी कृषी महोत्सव होणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडलाय. शेतकऱ्यांसह महोत्सवात धान्य, तांदूळ, कडधान्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही कृषी महोत्सव होईल की नाही यांचा अंदाज येईना झाला आहे आणि कृषी विभागातूनही याबाबत कोणी बोलायला तयार नाही.

‘कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी स्वतः पिकविलेला शेतीमाल शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांना विक्री करता यावा यासाठी राज्यात जवळपास अठरा वर्षांपूर्वी ‘धान्य व फळे महोत्सव’ ही संकल्पना पुढे आली. सर्वप्रथम तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांनी अहिल्यानगरला हा महोत्सव सुरू केला.

Aahilyanagar Agriculture Festival
Agriculture Festival : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सव

शेतकरी, ग्राहकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून नंतर दोन-तीन वर्षांनी हा उपक्रम राज्यात सुरू झाला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा गहू, अकोल्याचा तांदूळ, जामखेड-कर्जतची ज्वारी, विविध कडधान्ये, डाळींची शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. 

येथून धान्य, तांदूळ, कडधान्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. त्यातून सुमारे पाच कोटीपर्यंत अहिल्यानगरला उलढाल होत असल्याचाअनुभव आहे. कोरोना काळ वगळता अविरत हा महोत्सव सुरू आहे. साधारण आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून महोत्सव घेण्याबाबत यंदा मात्र सरकारी पातळीवर प्रयत्न असतात. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात हा महोत्सव घेतला जातो. आता धान्य बाजारात आले आहे. 

यंदा मात्र फेबुवारी महिना अर्धा संपत आला असला तरी अजून कृषी महोत्सव घेण्याबाबत कृषी विभागात कोणत्याही हालचाली नाहीत. त्याबाबत कोणाही बोलायला तयार नाही. मात्र कृषी व आत्मा विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने कृषी महोत्सवाबाबत अनभिज्ञता असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षी कृषी महोत्सव होणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com