Agriculture Festival : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महोत्सव

१८ ते २२ मार्चदरम्यान आयोजन; कृषी प्रदर्शन, परिसंवादासह यशोगाथांची मेजवानी
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon
Published on
Updated on

यवतमाळ : नवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सवाचे (Agriculture Festival ) आयोजन समिता मैदान येथे शनिवार (ता.१८) ते बुधवार (ता.२२) या कालावधीत करण्यात आले आहे. यासाठी कृषी अधीक्षक व महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. 

कृषी महोत्सवाचे उद्घाटन १८ मार्च रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहतील.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आप-आपसातील विचारांची देवाण-घेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्‍वास वृद्धिंगत होऊ शकतो.

Agricultural Festival
Nashik Krishi Exhibition : आकर्षक शेतीमाल पॅकिंग, प्रक्रियायुक्त उत्पादनांनी वेधले लक्ष

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा श्‍वाश्‍वत पद्घतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्घ करू शकतात.

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमाची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय,आदी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कृषी प्रदर्शन, कृषी परिसंवाद, अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंतांची भेट शेतकऱ्यांना घडणार आहे.

Agricultural Festival
Farmer Cup Competition : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सिंदखेड गावाला बक्षीस

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले, भाजीपाला, सेंद्रिय शेतमाल विक्री महोत्सवाचा समावेश राहणार आहे.

कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार मेळावा, आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबिर, पशुप्रदर्शन, कृषी संलग्न कंपन्यांचा समावेश व शेतकरी समारंभ कार्यक्रम होणार आहे. 

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवार आधारित हा महोत्सव असणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी, ग्राहकांनी भेट देऊन शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

...यांचे मिळणार मार्गदर्शन

सांस्कृतिक कार्यक्रमात संदीप पाल महाराज यांचे सप्त खंजिरी भजन, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे मिर्झा बेग एक्स्प्रेस, कापूस पिकावर कृषी कीर्तन करणारी शास्त्रज्ञ चमू, डॉ. राहुल एकबोटे यांची चैत्र पहाट संगीत, आदी कार्यक्रम होणार आहे.

त्याचप्रमाणे भास्करराव पेरे पाटील, पंजाबराव डख, पोपटराव पवार यांचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com