
Eknath Shinde VS Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १४ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या गटातील आमदार विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत.
शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पक्ष विरोधी कारवाई केल्याने त्यांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायलयाने निकाल देत असताना आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची मागणी केली.
नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार आज विधानसभेमध्ये राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाचे आमदार विधीमंडळ परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल ३४ याचिकांवर सुनावणी होईल.
या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.