Vidarbha Development : ‘शकुंतला’ देऊ शकते विदर्भाच्या विकासाला बळ

Shakuntala Train : १११ वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक रेल्वे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतरित करून विकसित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प मागे पडला आहे.
Shakuntala Train
Shakuntala TrainAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : अचलपूरपासून यवतमाळकरांसह विदर्भवासींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा रखडला आहे. १११ वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक रेल्वे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतरित करून विकसित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प मागे पडला आहे.

अमरावतीचे तत्कालीन खासदार सुदाम देशमुख यांनी शकुंतला नामकरण केलेली ही रेल्वेगाडी मागील एप्रिल २०१७ पासून पुलांच्या दुरुस्तीच्या नावावर बंद करण्यात आली. तेव्हापासून नागरिक शकुंतला सुरू होण्याची वाट पाहत आहेत. गोरगरिबांची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेली शकुंतला रेल्वे सुरू झाल्यास अचलपूर, दर्यापूर, मूर्तिजापूर, यवतमाळसह विदर्भाच्या अर्थकारणाला बूस्टर डोस मिळू शकतो, त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छा असणे गरजेचे आहे.

ब्रिटिशांनी पूर्वी साधन उपलब्ध नसल्याने अचलपूरसह यवतमाळ व विदर्भातील कापसाच्या गाठी तसेच इमारतीचे लाकूड मँचेस्टरला घेऊन जाण्यासाठी खरे तर ही रेल्वे सुरू केली होती. रेल्वेने हा कापूस मुंबईला जायचा आणि मग पुढे जहाजाने तो इंग्लंडला पाठविला जात असे.

Shakuntala Train
Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

सुरुवातीला स्टीम इंजिन होते, त्यानंतर १९९४ मध्ये स्टीम इंजिनच्या जागी डिझेल इंजिन आले, त्यानंतर २०१६ मध्ये ही रेल्वे ब्रिटिशांच्या मालकीतून मुक्त झाली आणि त्यानंतर तिचे धावणेही थांबले. या रेल्वेला नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे.

Shakuntala Train
Tribal Development : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा

शकुंतला वऱ्हाडवासींची पहिली पसंती

वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वे लाइनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाइन उभारली, तरी या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासींना आपलेसे केले.

अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती. ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही शकुंतला रेल्वे होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com