Bullet Train Project : राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा गाठला ऐतिहासिक टप्पा

Mumbai-Ahmadabad High Speed Rail : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणूतील साखरे गावात ४० मीटर लांबीचा आणि ९७० टन वजनाचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे.
Bullet Train Project
Bullet Train ProjectAgrowon
Published on
Updated on

Palghar News : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणूतील साखरे गावात ४० मीटर लांबीचा आणि ९७० टन वजनाचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे.

बुलेट ट्रेनचा राज्यातील १५६ किमी लांबीचा मार्ग असून यात मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भुयारी स्थानक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते ठाण्याच्या शिळ फाटादरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा, तसेच शिळ फाटा ते गुजरात सीमा भागापर्यंतचा १३५ किमी लांबीच्या उंचावरील मार्गिकेचा समावेश आहे.

Bullet Train Project
Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेन प्रकल्पात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. याप्रसंगी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. फूल-स्पॅन गर्डर्सना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जात असल्यामुळे सेग्मेंटल गर्डर्सपेक्षा सुमारे दहा पट जलद गतीने बांधकाम होत आहे.

Bullet Train Project
Bullet Train : राज्य सरकारचे बुलेट ट्रेनच्या गतीने काम सुरू ः बावनकुळे

पूर्ण लांबीचे प्री-कास्ट बॉक्स गर्डर्स स्वदेशी अवजड यंत्रसामग्रीद्वारे बसवले जात आहेत. यात स्ट्रॅडल कॅरिअर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गर्डर ट्रान्स्पोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीजचा समावेश आहे.

‘आत्मनिर्भरते’ला मदत

बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील एकूण १५६ किमी मार्ग असून, त्यात भुयारी बोगदे, उंचावरील मार्गिका, स्टील पूल व विशेष मातीच्या संरचना यांचा समावेश आहे.

शिळ फाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण नियोजित १३ कास्टिंग यार्ड्सपैकी पाच यार्ड्स कार्यान्वित आहेत. विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबचे कास्टिंगही यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली असून देश हाय-स्पीड रेल क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com