Iran-Israel Conflict : इराण आणि इस्त्रालयच्या संघर्षामुळे; देशात इंधन महागणार का?

oil import : मार्ग बंद झाल्याने ट्रान्सपोर्ट, एअरलाइन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. कारण या क्षेत्रांमध्ये इंधनाचा वापर अधिक असतो. त्यामुळे शेवटी वाढवलेली किंमत ग्राहकांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवा करातही वाढ होऊ शकते, असं अभ्यासकांचं मत आहे.
Iran-Israel Conflict
Iran-Israel ConflictAgrowon
Published on
Updated on

Iran-Israel Conflict : इराण आणि इस्त्रालय यांच्यात सुरू असलेला संघर्ष रविवारी (ता.२२) अमेरिकेच्या 'एंट्री'ने अधिकच गंभीर झाला. या पार्श्वभूमीवर, इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ मध्यपूर्वेतच नव्हे, तर भारतासह अनेक देशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. कारण हा मार्ग जगातील सुमारे २० टक्के तेल व्यापारासाठी महत्त्वाचा आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता कायम एक धोका राहिलेला आहे, असं जाणकार सांगतात. परंतु हा मार्ग प्रत्यक्षात कधीच बंद झाला नाही. आता मात्र हा निर्णय इराण व त्याचा मित्र देश चीनलाच सर्वाधिक त्रासदायक ठरेल, असं जाणकार सांगतात.

हा मार्ग बंद झाल्याने ट्रान्सपोर्ट, एअरलाइन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. कारण या क्षेत्रांमध्ये इंधनाचा वापर अधिक असतो. त्यामुळे शेवटी वाढवलेली किंमत ग्राहकांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळे वस्तु आणि सेवा करातही वाढ होऊ शकते, असं अभ्यासकांचं मत आहे.

Iran-Israel Conflict
India Crude Oil Import : रशियाहून कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ

भारत ८० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची गरज आयात करून भागवतो. त्यामुळे तेलाच्या किंमतीत होणारी वाढ ही भारतासाठी मोठी चिंता ठरते. तेल महाग झाल्यास इंधनाचा खर्च वाढतो आणि परिणामी महागाई वाढू शकते. यामुळे सरकारवर अनुदानाचा भार वाढतो आणि आयात खर्च देखील वाढतो.

इराणच्या या निर्णयानंतर इंधन टंचाई आणि महागाई विषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मात्र तेलाच्या साठ्याची चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.

"तेलाच्या किंमतीबाबत अचूक अंदाज वर्तवणे कठीण आहे. पूर्वी ६५-७० डॉलर दरम्यान असलेली किंमत ७०-७५ पर्यंत गेली होती. सध्या भारतात पुरेसा कच्चा तेल साठा आहे आणि सरकारने पुरवठा मार्गांमध्ये विविधता आणलेली आहे. भारतात दररोज सुमारे ५.५ मिलियन बॅरल कच्च्या तेलाची गरज असते, यातील केवळ १.५ ते २ मिलियन बॅरल तेल होर्मुज मार्गे येते. उर्वरित ४ मिलियन बॅरल इतर मार्गांनी येते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही," असं पुरी यांनी म्हणाले.

Iran-Israel Conflict
US Airstrike On Iran : अमेरिकेचे इराणच्या अणुकेंद्रांवर बॉब हल्ले

तसेच देशातील तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे. अनेक कंपन्यांकडे तीन आठवड्यांचा साठा आहे. तर एका कंपनीकडे २५ दिवसांपर्यंतचा साठा आहे. तसेच आम्ही पर्यायी मार्गांद्वारेही पुरवठा सुरू ठेवू शकतो. सर्व भागीदारांशी आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे, असंही पुरी यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com