Livelihood of Tribals : आदिवासींना उदरनिर्वाहासाठी रानफुले, बियांचा आधार

Tribal Employment : जंगलातील काही झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बिया येथील आदिवासींना वरदान ठरत आहेत. या जंगली रानमेव्याची विक्री करून एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
Ranmeva
RanmevaAgrowon

Palghar News : जंगलातील काही झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बिया येथील आदिवासींना वरदान ठरत आहेत. या जंगली रानमेव्याची विक्री करून एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषत: तालुक्याच्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून वस्तुविनिमय पद्धतीने रानमेव्याची खरेदी होत असून या माध्यमातून आदिवासींना रोज संसार उपयोगी वस्तू उपलब्ध होत आहेत.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जंगलसंपत्ती आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू व वाडा हे आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील जंगल भागात राहणारी शेकडो आदिवासी कुटुंबे ही जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बी विकून आपला संसारगाडा चालवत असतात.

Ranmeva
Land Dispute : जुनी खरेदी; परंतु मालकच सापडेना

जंगलातील साग, नीलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सीताफळ, डिंक, सागरगोटे, रिठा, बावा आदी जंगली झाडांच्या बिया; तसेच सुकवलेली मोहफुले आणि तेलबिया यांची विक्री करून रोजगार मिळवत आहेत. जंगली झाडे व अन्य वनऔषधी वनस्पती यांच्या बियांना शहरी भागात खूप मागणी आहे. तसेच विविध जंगली झाडांच्या रोपवाटिकेचा व्यवसाय करणाऱ्यांकडून या बियाण्यांची विशेष खरेदी केली जात आहे. सरकारने जंगली बिया खरेदी करण्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून केली जात आहे.

वस्तूंच्या बदल्यात वस्तूंचा व्यवहार

बियाण्याच्या बदल्यात कांदा, बटाटा आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जंगली वनस्पतींचे बियाणे खरेदी केले जाते. त्या बदल्यात व्यापारी मिरची पावडर, डाळी, कांदा, बटाटा; तसेच संसारउपयोगी भांडी देत असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होत नाही. वस्तूंच्या बदल्यात वस्तूच दिली जाते.

Ranmeva
Maherghar Yojana : मेळघाटातील माहेरघर उरले नावालाच

नाशवंत वनस्पतींची साठवण

विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात जंगली झाडांची बियाणे, फुले खरेदी करण्यासाठी खास व्यापारी येत असतात. जंगली वनस्पतींची काही फुले, बिया या नाशवंत असल्याने त्यांची योग्य साठवण केली तरच फायदेशीर ठरते, असे व्यापारी भानुशाली यांनी म्हटले आहे.

जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास आदिवासींना अधिक किंमत (दर) मिळेल.
घनश्याम आळशी, माजी अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, विक्रमगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com