Maherghar Yojana : मेळघाटातील माहेरघर उरले नावालाच

Health Department : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना आधारवड ठरणार, अशी आशा आरोग्य विभागाला वाटत होती.
Maherghar Yojana
Maherghar Yojana Agrowon

Amravati News : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना आधारवड ठरणार, अशी आशा आरोग्य विभागाला वाटत होती. त्यामुळे मेळघाटातील अकरा आरोग्यकेंद्रांपैकी नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रात माहेरघर योजना सुरू केली. मात्र योजनेच्या सुरवातीपासूनच या योजनेला गर्भवती महिलांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मेळघाटातील हक्काचे माहेरघर आज नावालाच उरले आहे.

मेळघाटसह राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील दरवर्षी होणाऱ्या मातामृत्यूला आळा बसेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आरोग्य विभागाने गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना सुरू केली.

Maherghar Yojana
Tribal society Migration : समूह शेतीमुळे थांबले आदिवासींचे स्‍थलांतर

सदर योजना ही मेळघाटातील अकरा प्राथमिक आरोग्यकेंद्रांपैकी नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रांत सुरू करण्यात आली आहे. मात्र योजनेच्या सुरवातीपासूनच गर्भवती महिलांनी माहेरघरला प्रतिसाद दिला नाही. परिणामी मेळघाटात या योजनेचा पाहिजे तेवढा आरोग्य विभागाला लाभ होताना दिसून येत नाही.

Maherghar Yojana
Tribal Farmers : आदिवासी शेतकऱ्यांना सुरक्षा साधनांचे वितरण

माहेरघर योजनेंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीच्या चार ते पाच दिवस आधी आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेच्या माध्यमातून सर्वंकष सेवा दिली जाते, जेणेकरून प्रसूतीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि प्रसूती सुखरूप होण्यास मदत होईल.

मात्र मेळघाटात सुरवातीपासूनच या योजनेला गर्भवती महिलांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे की काय आजही मातामृत्यूला आरोग्य विभागाकडून शून्य उद्दिष्टपूर्ती करण्यास यश मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. गर्भवती मातांच्या अल्प प्रतिसादामुळे आरोग्य कर्मचारीसुद्धा हतबल झाले आहेत. ज्यामुळे गर्भवती महिलांच्या प्रसूतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले माहेरघर आजरोजी नावालाच उरले आहे.

मेळघाटच्या बहुतेक महिला आजही सरकारी दवाखान्यात प्रसूती करायला तयार नाहीत. चिखलदरा असो की अचलपूर, येथील काही डॉक्टर व कर्मचारी आपले घोंगडे दुसऱ्यावर लोटण्यासाठी रुग्णांना रेफर करतात. ज्यामुळे मेळघाटातील गर्भवती महिला अचलपूरच्या सरकारी रुग्णालयात जाण्यास नकार देतात.
-सागर डांगे, तालुकाध्यक्ष, वैद्यकीय मदत कक्ष शिवसेना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com