Forest Fire : सातपुड्यात डिंकासाठी वणवे लावण्याचे प्रकार

Gum Extraction : सातपुडा पर्वतात मध्य प्रदेश व खानदेशच्या सीमेलगत बहुमूल्य डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार होत आहेत.
Forest Fire
Forest Fire Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सातपुडा पर्वतात मध्य प्रदेश व खानदेशच्या सीमेलगत बहुमूल्य डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार होत आहेत. यात काही डिंग तस्कर व चोरटे सहभागी असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पर्याावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

सातपुड्यातील मौल्यवान वनसंपदेची वणव्यांमुळे सतत हानी होत आहे. कारण मधील काळात वृक्षतोड झाली. बांबू, साग व अन्य वृक्षांची बेसुमार कत्तल चोरट्यांनी केली. नंतर जमिनीसाठी वृक्षतोड झाली. अतिक्रमणाचा मुद्दा कायम आहे. वणवे पेटण्याचे प्रकारही आता वाढले आहेत. अनेकदा पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे वणवे पेटतात, असा आरोप केला जातो.

खानदेशात नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर या भागालगत सातपुडा पर्वताचा भाग आहे. सातपुड्याच्या पलिकडे मध्य प्रदेश आहे. यावल अभरारण्याचा ठेवा याच सातपुडा भागात आहे. या सीमाभागात चोरटे सक्रिय असतात.

डिंकाबाबत गैरसमज

अमूल्य डिंक निर्मितीसाठी हे वणवे पेटविले जातात. झाडांना आग लावल्यास डिंक चांगला तयार होतो, असा समज चोरटे, माफिया मंडळीत आहे. तसेच काही वृक्ष पेटल्यानंतर त्यांची कत्तल करून वाहतूकही सोपी होते, यामुळे हे वणवे दरवर्षी पेटवले जातात, असा दावा जाणकार, पर्यावणप्रेमी करतात. काही स्वयंसेवी संस्था सातपुड्याच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत.

Forest Fire
Forest Fire : पोलादपुरात वणव्यांमुळे वनसंपदा धोक्‍यात

परंतु वणवे पेटविण्याचे प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरूच आहेत. त्यात अवैध वृक्षतोड सुरूच आहे. सागवान व अन्य जातीच्या वृक्षांचे बाजारात मागणी असलेले लाकूड जप्त करण्याच्या अनेक कारवाया यंदाही यावल, चोपडा, रावेर भागात झाल्या आहेत. चोरटे स्थानिकांना फसवून, चुकीची माहिती व अमिष दाखवून आपले काम करून घेतात.

वृक्षतोड व वणवे यामुळे सातपुडा पर्वतांचा परिसर बोडका झाला आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे. या काळात वणवे अधिक पेटून ते लागलीच वाढतात. त्यांची तीव्रता अधिक राहत असल्याने स्थानिक, ग्रामस्थ ते लागलीच आटोक्यात आणू शकत नाहीत. यामुळे वन विभागाने याबाबत सतर्कता ठेवून कार्यवाही करावी, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Forest Fire
Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्यात

ड्रोनद्वारे ठेवा लक्ष

अनेकदा पर्यटक, निसर्गप्रेमी आदी सातपुड्यात अवैधपणे जातात. यात अनावधानाने आगकाडी किंवा अन्य बाबींमुळे आग लागते. यामुळे काही महत्त्वाच्या, संवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास बंदी केली पाहीजे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

आग लागल्याची घटना घडल्याने वन विभागाने पर्यटकांनी किंवा नागरिकांनी सातपुड्यातील वनक्षेत्रात अवैधपणे जावू नये, असे म्हटले आहे. त्यात यासंबंधी पर्यटकांमध्ये जनजागृती करावी, ड्रोनद्वारे बारकाईने वनक्षेत्रावर नजर ठेवावी, अशी मागणीही केली जात आहे. वणवे पेटल्यास जैवविविधता नष्ट होते. तसेच वन्यप्राण्यांनाही इजा होते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com