
Nashik News : एरवी क्वचितच दिसणारे हरणांच्या कळपांचे दृश्य विलोभनीय असले, तरी विहार करणाऱ्या या हरणांच्या वाढत्या संख्येने तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत.
तालुक्याच्या नाग्यासाक्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात लपण क्षेत्र व पिण्याचे मुबलक पाणी यामुळे धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्राच्या मागे पांझण खोऱ्यात शास्त्रीनगर धनेर कोंढार,साकोरा मन्याड गिरणा खोऱ्यात असलेल्या कळमदरी, जामदरी मुळडोंगरी रणखेडा बिरोळे तर पितळ खोऱ्यात असलेल्या ढेकू परधाडी देहरे भागातील वनक्षेत्रात काळवीट व हरणांची सर्वाधिक संख्या दिसून येत असते. नुकताच कुठे उन्हाळा सुरु झाला आहे.
त्याच्या सुरुवातीला हरण काळवीट पाणवठ्यावर दिसू लागले आहेत. जिल्ह्यातील तृणभक्षक प्राण्यांमधील हरीण काळवीट यांची येवला पाठोपाठ सर्वाधिक संख्या असलेल्या नांदगाव तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने हरिण काळविटांची पाण्याच्या शोधासाठी भटकंती आता नजरेस पडू लागली आहेत.
नांदगावला पाणवठ्याची गरज
येवला तालुक्यात वनविभागाचे वन्यप्राण्यांसाठी पाणवठे आहेत त्याच धर्तीवर नांदगाव तालुक्यात हरणाच्या कळपासाठी वन विभागाने पाणवठे करण्याची आवश्यकता भासू लागली आहे पाणी व चारा च्या शोधार्थ हे तृणभक्षी प्राणी चौफेर संचार करताना दिसणे ही बाब आता सामान्य बनली आहेत.
अनाहूत भटकणाऱ्या या प्राण्यांचे यापूर्वी मानवी रस्त्याजवळ वावरणे व त्यातून घडणारे अपघात यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कायम चर्चेत असतो. मोठ्या संख्येने असणाऱ्या हरणांमुळे गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर देखील वाढल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या आहेत.
पिकांचे नुकसान
तालुक्यातील वनक्षेत्रात कुरणक्षेत्र नसल्याने कळमदरी,जामदरी मुळडोंगरी ढेकू आदी मन्याड-पांझण खोऱ्यात आढळणाऱ्या हरणांचे कळप शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसून नासाडी करू लागले आहेत. हरणांच्या वाढत्या कळपामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे .
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.