Agriculture Irrigation : सिंचनासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण

Agriculture Electricity : रब्बी हंगामातील बहुतांश पेरणी आटोपली असून उर्वरित ठिकाणी पेरण्यांना वेग आलेला आहे. अशा काळात सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांना नितांत आवश्‍यकता निर्माण झालेली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Akola News : रब्बी हंगामातील बहुतांश पेरणी आटोपली असून उर्वरित ठिकाणी पेरण्यांना वेग आलेला आहे. अशा काळात सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांना नितांत आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. शासनाने आठवडाभर दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. रात्रीच्या काळात वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांना जागरण करावे लागते आहे.

रब्बी हंगामातील पिकांचे सिंचन करण्याची एकच लगबग सुरू आहे. या भागात प्रकल्प आधारीत सिंचनाच्या सोयी कमी असल्याने बहुतांश रब्‍बी हंगामात संरक्षित पाण्याच्या पाळ्या या विहीर, बोअरवेलवरून कराव्या लागतात.

Agriculture Irrigation
Agricultural Electricity : सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू : अजित पवार

यासाठी कृषिपंपाला वीजपुरवठा हवा आहे. सध्या आठवड्यातील काही दिवस रात्री व काही दिवस दिवसाला वीजपुरवठा केला जातो. त्यातही दिवसाच्या पुरवठ्यात अनेकवेळा तांत्रिक दोष निर्माण होऊन वीज खंडित राहण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा अडचणीमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी दिवसरात्र सतर्क राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Agriculture Irrigation
Agriculture Electricity : शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा द्या

वन्य प्राण्यांचाही त्रास

दिवसा वीज पुरवठ्याअभावी आठवड्यातील काही दिवस शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी जागरण करावे लागते. अनेक शेतशिवार वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. हे प्राणी पिकांना नुकसानकारक ठरतात तसेच शेतकऱ्यांसाठीही धोकादायक असतात. शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना अधूनमधून होतच राहतात.

आम्हाला ४८ तासांमध्ये १६ तास वीज मिळते. रात्री दहा वाजता वीज येते व पहाटे दोनला जाते. त्यामध्ये सबस्टेशन वरुन शेवटचे गाव असून वीज आम्हाला पूर्ण दाबाने भेटत नाही. सुदी अनसिंग या दोन्ही गावेमिळून आम्ही या मुद्यावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असता आम्हाला महावितरण कडून दहा दिवसांत विजेची समस्या दूर करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. आमच्या पाच गावांसाठी स्वतंत्र फिटर देत असल्याचे त्यांनी सांगितले. विजेचा लपंडाव सुरू आहे. शेतात पिके उभी असल्याने शेतकरी खांब उभारू देत नसल्याचे काम पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न कधी सुटेल याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.

- विनोद पाटील, सुदी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com