Indrayani Rice : इंद्रायणी तांदूळ चिकट आणि सुवासिक का असतो?

पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी हे नाव पडलं.
Indrayani Rice
Indrayani Rice Agrowon

पूर्वी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता खादाड लोकांचं माहेरघर बनलंय. कोल्हापूरच्या मिसळीचे जास्त फॅन पुण्यातच असतील. गल्लीबोळात चुलीवरच्या मटनापासून चुलीवरच्या पिझ्झापर्यन्त अनेक रेस्टॉरंट फॉर्मात चालत आहेत. पुणेकरांची आणखी लाडकी गोष्ट म्हणजे इंद्रायणी तांदूळ (Indrayani Rice). मटणाच्या थाळी (Mutton Thali) बरोबर मस्त चिकट इंद्रायणी भात आणि त्यावर तुपाची धार. ब्रम्हानंदी टाळीच. अशा या पुणेकरांच्या लाडक्या इंद्रायणी तांदळाची गोष्ट (Story Of Indrayani Rice) तुम्हाला माहित आहे? आज बघूया.

Indrayani Rice
मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला पसंती

पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी (Indrayani Ricer) वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी (Indrayani Fragrant Rice) हे नाव पडलं. मावळातील वडगाव दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. जर संदर्भ इतिहासाचा द्यायचा असेल तर मराठ्यांचे झुंजार सेनानी महादजी शिंदे (Mahadaji Shinde) यांचं नाव निघतं. ११७९ मध्ये पहिल्या मराठा-ब्रिटिश युद्धात मावळ प्रांतात महादजींनी गोऱ्या सैनिकांची धूळधाण केली. भेदरलेलं ब्रिटिश सैन्य याच वडगावमध्ये महादजींना सपशेल शरण आलं होतं.

Indrayani Rice
खवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ

पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी हे नाव पडलं. मावळातील वडगाव दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. जर संदर्भ इतिहासाचा द्यायचा असेल तर मराठ्यांचे झुंजार सेनानी महादजी शिंदे यांचं नाव निघतं. ११७९ मध्ये पहिल्या मराठा-ब्रिटिश युद्धात मावळ प्रांतात महादजींनी गोऱ्या सैनिकांची धूळधाण केली. भेदरलेलं ब्रिटिश सैन्य याच वडगावमध्ये महादजींना सपशेल शरण आलं होतं.

वडगावच्या भात संशोधन केंद्राचे पहिले शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव कळके हेच 'इंद्रायणी'चे जन्मदाते. त्यांनी सलग १६ वर्षे या केंद्रात भातावर संशोधन केलं. डॉ. कळके यांच्या शास्त्रज्ञ चमूने १९८७ मध्ये आय.आर.८' आणि आंबेमोहोर या दोन जुन्या भात वाणांचा संकर केला. त्यातून नवे सुवासिक इंद्रायणी वाण तयार झाले. सुवासाचा उत्तम प्रतीचा, चिकट आणि चवदार तांदूळ ही इंद्रायणीची ओळख निर्माण झाली आहे. इंद्रायणीला सुवास मिळाला तो आंबेमोहोर या पारंपरिक भात वाणापासून. आंबेमोहोर हा कुणा शास्त्रज्ञाने शोधलेला नाही. तो शेकडो वर्षांपासून मावळात आहे.

आंबेमोहोरला सुवास, चव, गावरान परंपरा आहे. अर्थात, त्याच्या काही उणिवादेखील आहेत. त्याचे हेक्टरी उत्पादन फक्त १८ ते २० क्विंटल आहे. हे वाण कीड-रोगांना लवकर बळी पडणारे आहे. त्यामुळे डॉ. कळके यांनी आंबेमोहोरचे मूळ उत्तम गुण कायम ठेवत त्यात सशक्तपणा व जादा उत्पादनाचा गुणधर्म आणण्याचा विडा उचलला. त्यातूनच इंद्रायणी हा वाण अवतरला.

इंद्रायणी भाताला चिकटपणा ‘अमायलेज’ या पिष्टमय रेणुच्या घटकामुळे येतो. तसेच, ‘२ एपी’ नावाच्या गंध संयुगामुळे भाताला सुवास मिळतो. विशेष म्हणजे जमीन डोंगराळ, नदीकाठची, मध्यम खोलीची असल्यास आणि पीक फुलोऱ्यात असताना आर्द्रता ६९ ते ७४ टक्क्यांच्या दरम्यान असेल तरच सुवास देणारा ‘२ एपी’ हा घटक पिकात तयार होतो. निसर्गाची ही अद्भूत किमया केवळ मावळाच्या पट्ट्यात दिसते. त्यामुळे राज्यातील इतर भागांत पिकणाऱ्या इंद्रायणी तांदळाला मावळातल्या इंद्रायणीची सर येत नाही, असं म्हणतात.

सुवासिक भाताची अनेक वाण आहेत मात्र चिकटपणा आणि सुवास ही इंद्रायणी भाताची कवचकुंडल आहेत. नुसत्या वरणात नाही तर दुधात इंद्रायणी कालवला की तो खाताना त्यात तूप मिसळल्याची जाणीव जिभेला होते. या भाताच्या गुणामुळे आज त्याची बाजारपेठ राज्यभर वाढताना दिसतेय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com