Soybean Cotton Anudan : सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार?

सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. पण सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार?
Soybean Cotton Anudan
Soybean Cotton AnudanAgrowon
Published on
Updated on

सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. पण आता एक चर्चा अशी आहे की, सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन कारणं दिली जात आहेत. एक म्हणजे २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची नोंदणीवरून उडलेला गोंधळ. दुसरं म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार. तर दुसरीकडे २१ ऑगस्टपासून सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी देखील चर्चा आहे.

सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत. २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलवर नोंदणी केली, असे शेतकरी पात्र ठरणार आहेत.

Soybean Cotton Anudan
Farmer Loan : कर्जमाफीसाठी सहकारमंत्री वळसे-पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचं संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचं आहे. तर सामायिक खातेदारांना एक ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे. जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदारांच्या नावावर जमा करण्यात येईल.

पात्र शेतकऱ्यांची संख्या ?

कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेली राज्यातील ९० लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक या योजनेला पात्र आहेत. त्यामध्ये ५८ लाख सोयाबीन उत्पादक आहेत तर ३२ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. यामध्ये ७५ लाख खातेदार आहेत. तर १५ लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार संमती पत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार म्हणजे २१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असंही कृषी विभागाने सांगितलं आहे.

अनुदान बँक खात्यात कधी ?

राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावानं खातं उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. म्हणजे या योजनेसाठी ४ हजार १९४ कोटी रुपयांचा जो निधी देण्यात आला आहे, तो या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावं, यासाठी कृषी विभाग काम करत आहे. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालवधी लागेल. सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल, असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाई करू नये. तसेच कृषी विभागाला संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहनही कृषी विभागानं केलं आहे.

बहुतांश शेतकऱ्यांची ई-पीक पेऱ्यात सातबारावर सोयाबीन-कापूस नोंदणी केली आहे. पण यादीत नावं नाहीत, त्यामुळं शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करत आहेत. तर महसूल विभागानं दिलेल्या डाटानुसार यादी जाहीर करण्यात आल्याची कृषी विभागाने सांगितले आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात पाहिल्या आठवड्यात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण या सगळ्यात सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झालेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com