Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Sludge Remove Inspection : मध्यम प्रकल्प व उमरदरा लघू पाटबंधारे तलावात शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या गाळ उपशाची पाहणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केली.
Sludge
SludgeAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून विविध ठिकाणच्या लहानमोठ्या तलावातून गाळाचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अभियानात गुरुवारी (ता. १५) घरणी (ता. शिरूर अनंतपाळ) मध्यम प्रकल्प व उमरदरा लघू पाटबंधारे तलावात शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या गाळ उपशाची पाहणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केली. अभियानामुळे जमिनीचा कस सुधारून त्या सुपीक होतील व त्यासोबत धरणातील पाणी साठवण क्षमता पुनरुज्जीवित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sludge
Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार गोविंद पेदेवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अभियानात घरणी मध्यम प्रकल्पातून आतापर्यंत नऊ गावांतील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सहा लाख दहा हजार घनमीटर गाळ उपसा केल्यामुळे प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत अंदाजे सहा कोटी लिटरने वाढ होणार आहे.

उमरदरा तलावातून ४६ शेतकऱ्यांनी ३२ हजार घनमीटर गाळाचा उपसा केला असून, तलावाची साठवण क्षमता ३२ लाख लिटरने वाढणार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कांबळे यांनी या वेळी सांगितले. गाळ उपसा केल्यानंतर प्रकल्प परिसर तसेच गाळ टाकलेल्या शेताच्या बांधावर फळझाडे लावून शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वृक्षारोपण मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी या वेळी केले.

Sludge
River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

वृक्ष लागवड आवश्यक

वृक्षांचे प्रमाण कमी असल्याने तापमानात वाढ, वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, दुष्काळ, बदलेले ऋतू चक्र आदी विपरीत परिणाम होत आहेत. पर्यावरण संतुलन नसल्याने होणाऱ्या परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. असे जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी सांगितले.

गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरत असून, शेतात टाकण्यासाठी एकरी एक लाख रुपये लागत आहेत. इच्छा असतानाही पैशाअभावी गाळ उपसा आटोपता घ्यावा लागत आहे. शासनाने शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिल्यास गाळ उपसा मोहिमेला बळ मिळणार आहे.
रवी ढोले, शेतकरी, नळेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com