Bogus Seed : बोगस बियाणे, बनावट खत प्रकरणी कडक कारवाईचे केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचे आदेश

Shivrajsingh Chauhan : शेतकरी निकृष्ट दर्जाचं खतं बियाणे, किटकनाशक मिळाल्या म्हणून तक्रार करतात. शेतकऱ्यांचं त्यातून नुकसान होतं. पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार बैठकीत चौहान यांच्याकडून भर देण्यात आला.
Shivrajsingh Chauhan
Shivrajsingh ChauhanAgrowon
Published on
Updated on

Agriculture News : बनावट बियाणे खत आणि किटकनाशकांचा बाजारात सर्रास विक्री केली जात असल्याने केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रायलायतील अधिकाऱ्यांना कडक करावाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी राज्य सरकारांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाने निवदेनातून प्रसिद्ध केली आहे.

देशभरात शेतकऱ्यांनअ चांगल्या दर्जाची खतं, बियाणे आणि किटकनाशके मिळतील, याची खात्री केली पाहिजे, असं शिवराजसिंह चौहान म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. २८) केंद्रीय कृषी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चौहान यांनी कडक शब्दांत कारवाईचा इशारा दिला.

Shivrajsingh Chauhan
Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाची घोषणा लांबणीवर; मुंबईतील बैठक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना

शेतकरी निकृष्ट दर्जाचं खतं बियाणे, किटकनाशक मिळाल्या म्हणून तक्रार करतात. शेतकऱ्यांचं त्यातून नुकसान होतं. पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार बैठकीत चौहान यांच्याकडून भर देण्यात आला. त्यासाठी अधिकाऱ्यांना उपाययोजना राबवण्याचे आदेशही दिले.

बोगस बियाणे आणि बनावट खत, किटकनाशकांशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे राज्य सरकारांशी याबद्दल चर्चा करण्यात येईल, असं चौहान म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात बोगस बियाणे आणि बनावट खत प्रतिबंधात्मक कायद्यासाठी विधीमंडळात विधेयक मांडण्यात आलेली आहे. या विधेयकांमध्ये बोगस बियाणे आणि बनावट खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर दंड लादणे, अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, मोका कायदा लावणे, कैद करणे अशा तरतुदी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com