Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Well Update : येत्या चार आठवड्यांमध्ये आयुक्तांनी या विहिरींची स्वच्छता, पुनरुज्जीवन यावर धोरण सादर करण्याचे आदेश दिले.
Well
Well Agrowon

Nagpur News : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) सर्वेक्षणानुसार शहरातील ५० टक्के सार्वजनिक विहिरीतील पाणी पिण्यास योग्य नाही. ८०० सार्वजनिक विहिरींपैकी १६० विहिरीतील पाणी वापरण्या योग्य नसल्याची कबुली स्वत: महापालिकेने मागील सुनावणीमध्ये दिली आहे. परंतु, उत्तरामधून तुम्ही उचललेले पावले, तुमचे धोरण स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला खडसावले. तसेच, येत्या चार आठवड्यांमध्ये आयुक्तांनी या विहिरींची स्वच्छता, पुनरुज्जीवन यावर धोरण सादर करण्याचे आदेश दिले.

Well
Approval of wells : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६५ विंधन विहिरींना मंजुरी

नागपूर शहरातील अर्ध्याहून अधिक सार्वजनिक विहिरींचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. या विहिरी एकतर कोरड्या पडल्या आहेत किंवा त्यांचे रूपांतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाले आहे. त्यामुळे, या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची विनंती करणारी संदेश सिंगलकर यांची जनहित याचिका प्रलंबित आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. सिंगलकर यांनी माहितीच्या अधिकारात शहरातील सार्वजनिक विहिरींच्या स्थितीबाबत माहिती मागितली असता महापालिकेने माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे, या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिका प्रलंबित असताना महापालिकेने नीरीला शहरातील विहिरींची पाहणी करण्याचे आदेश देत अहवाल मागविला होता.

Well
Acquisition of Well : यवतमाळ जिल्ह्यात सात खासगी विहिरींचे अधिग्रहण

अहवालात शहरातील ८०० सार्वजनिक विहिरींपैकी १६० विहिरींची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली होती. ही याचिका २०२१ मध्ये दाखल करण्यात आली. तेव्हापासून आजवर या विहिरींची स्वच्छता, त्यांच्या पुनरुज्जीवनावर महापालिकेने कुठलेही पावले उचलल्याने दिसून आले नसल्याचे निरिक्षण नोंदविले. महापालिका आयुक्तांनी चार आठवड्यामध्ये यावर धोरण सादर करावे, असे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. स्मिता सिंगलकर आणि महापालिकेतर्फे ॲड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

विहिरींमध्ये गटरलाइनचे पाणी : नीरी

नीरीच्या सर्वेक्षणानुसार शहरातील ५० टक्के सार्वजनिक विहिरीतील पाणी पिण्यास योग्य नाही. नागरिकांनीच या विहिरींची नासधूस केली आहे. या विहिरी कचऱ्यांनी तुडुंब भरल्या असून इतर काही विहिरींमध्ये गाळ, शेवाळ, झाडे-झुडपे वाढली आहेत. तर, काही विहिरींमध्ये गटरलाइनचे पाणीदेखील मिसळले गेले आहे. त्यामुळे, या सार्वजनिक विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com