Approval of wells : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६५ विंधन विहिरींना मंजुरी

Water Shortage : पाणीटंचाई निवारण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात ४१ गावांसाठी सात कूपनलिका आणि ६५ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
Agriculture Well
Agriculture WellAgrowon

Buldhana News : पाणीटंचाई निवारण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात ४१ गावांसाठी सात कूपनलिका आणि ६५ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

Agriculture Well
Well Scheme : वंचितांना एक हजार ९३ विहिरी

पाणी टंचाई निवारणार्थ शेगाव तालुक्यातील चार, सिंदखेडराजा २६, खामगाव एक, नांदुरामधील १०, बुलडाणा ४१ गावांसाठी सात कूपनलिका व ६५ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विंधनविहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कामाचा पंचनामा करावयाचा आहे.

Agriculture Well
Agriculture Well : ‘रोहयो’तून ७ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विहिरी

विंधन विहिरी शेगाव तालुक्यातील जानोरी, बेलुरा, कुरखेड, चिंचखेड, सिंदखेराजा तालुक्यातील दत्तपूर, डावरगाव, जऊळका, किनगाव राजा, पांगरी उगले, उगला, सावरगाव माळ, आडगाव राजा, शेलू, धांदरवाडी, जांभोरा, केशव शिवणी, वाघरुळ, वाकद जहागीर, मलकापूर पांग्रा, जळगाव, निमगाव वायाळ, पिंपळखुटा, निमखेड कसबा, सोनोशी, सोयदेव, तढेगाव, उमरद, वडाळी, वाघाळा, रुम्हणा,

खामगाव तालुक्यातील खामगाव ग्रामीण, नांदुरा तालुक्यातील निमगाव, दादगाव, हिंगणा भोटा, हिंगणा दादगाव, बेलाड, खरकुंडी, पलसोडा, धाडी, हिंगणे गव्हाड, मोमिनाबाद या गावांसाठी कूपनलिका व विंधनविहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास निश्चित मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com