Budget Session Maharashtra
Budget Session MaharashtraAgrowon

Budget Session Maharashtra : परिक्षार्थी त्रस्त सरकार मस्त!; एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीवरून विरोधक आक्रमक

Budget Session : गुरूवार (ता.२९) अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. तसेच परिक्षार्थी त्रस्त सरकार मस्त! अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
Published on

Pune News : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरूवारी (ता. २९) देखील विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी परिक्षार्थी त्रस्त सरकार मस्त! अशा जोरदार घोषणा देत, राज्यातील एमपीएससी परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा. तसेच तलाठी भरतीची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे विधानपरीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस आमदार पीएन पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह विरोधक आमदार उपस्थित होते. 

पेपरफूटीचे प्रकरणावर विरोधक आक्रमक

गेल्या काही महिन्यात राज्यातील एमपीएससी परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. तसेच तलाठी भरतीत देखील पेपरफूटीचे प्रकरण समोर आले होते. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे नुकसान होत आहे. यावरून अनेकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी देखील आवाज उठवला होता. या प्रश्नावरून राज्यातील विरोधकांनी अधिवेशानाच्या चौथ्या दिवसाच्या कामकाजा आधी आवाज उठवला. विधानपरीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विरोधक आमदारांनी या प्रश्नावरून जोरदार घोषणाबाजी केली. 

Budget Session Maharashtra
Budget Session Maharashtra : कापसाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

एसआयटी नियुक्त करा

यावेळी विरोधक आमदारांनी, परिक्षार्थी त्रस्त सरकार मस्त!, तलाठी भरतीची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घ्या, राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढा, अशा आशयाचे बॅनर हातात घेतले होते. तसेच, जर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी केली जात असेल तर एमपीएससीतील होणाऱ्या गोंधळ, पेपरफूटीवर देखील एसआयटी नियुक्त करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

कापसाला भाव द्या

दरम्यान विरोधकांनी बुधवारी (ता.२८) कापसाच्या मुद्द्यावरून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. यावेळी विरोधकांनी हातात गाजरे, गळ्यात कापसाच्या माळा घालून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कापसाला १४ हजार रुपये प्रति क्क्विंटल भाव द्या, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com