Women's Policy : ... तर महिला धोरणाचा आनंद होईल

Sharad Pawar : महिलांना संधी दिल्यास त्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत. महिलांना विविध क्षेत्रांत संधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना महिला धोरण आणले, त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसू लागले आहे.
Woman Policy
Woman PolicyAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘महिलांना संधी दिल्यास त्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत. महिलांना विविध क्षेत्रांत संधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना महिला धोरण आणले, त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसू लागले आहे. महिला आता विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मात्र लोकसभा, विधानसभेमध्ये अद्यापही महिलांची संख्या कमी दिसत आहे.

केंद्र सरकारने राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण दिल्याचे विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी २०२९ मध्ये होणार असल्याचे सांगितले आहे. या धोरणाची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा असून, अंमलबजावणी झाल्यास मी ३० वर्षांपूर्वी आणलेल्या महिला धोरणाचा आनंद होईल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्विनी सन्मान पुरस्कारांचे वितरण शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.२२) करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ उद्योजिका पद्मश्री अनु आगा, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी सनदी अधिकारी अजित निंबाळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी शरद पवार म्हणाले, की कर्तृत्वाचा वारसा फक्त पुरुषच पुढे नेत नसतात, तर संधी दिल्यास महिला देखील कर्तृत्व सिद्ध करून दाखवितात. कर्तृत्वान महिलांची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अनू आगा या देखील जुन्या काळातले प्रेरणादायी महिला उद्योजकतेचे उदाहरण आहे. पुरुषी प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रात उतरून अनू आगा यांनी थरमॅक्स कंपनी उभारली, त्याची उलाढाल आता १५ हजार कोटी रुपयांची आहे.

Woman Policy
Sharad Pawar : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; आरक्षण, दूध दराच्या बैठकीसाठी आग्रही

मी काँग्रेस पक्षात असताना महिलांच्या राजकीय आरक्षणाचे विधेयक मांडले होते. हे विधेयक मांडतानाच माझ्या पक्षाच्या ७० टक्के खासदारांनी सभागृह सोडले होते. तर, एका नेत्याने विधेयक माझ्यासमोर फाडले होते. मात्र हेच विधेयक आता मंजूर झाले असून, त्याची अमंलबजावणी २०२९ ला करण्याचे सांगण्यात येत आहे. याची अमंलबजावणी झाल्यास ३० वर्षांपूर्वी आणलेल्या महिला धोरणाचा आनंद होईल.

पद्मश्री अनु आगा म्हणाल्या, की महिलांना अंतर्गत खूप संघर्ष करावा लागतो. महिला उद्योग व्यवसायात येताना घरातून पाठिंबा मिळत नसल्याने त्या कर्तृत्व सिद्ध करू शकत नाहीत. सध्याच्या युगात नोकरदार स्त्रिया घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत यशस्वी होत आहेत. त्यांना अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आजच्या सहा पुरस्कार्थी महिला या इतर महिलांना प्रेरणादायी आहेत. त्यांचे मी अभिनंदन करते.

या कार्यक्रमात सकाळ प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महिला धोरण कुठं आलं गं बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर अंकुश काकडे यांनी आभार मानले.

Woman Policy
Woman's Day : कृषी शिक्षणात मुलींचा टक्का वाढला

एकल महिलांना १ लाखांची फेलोशिप

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण, तरुणींना विविध विषयांमध्ये फेलोशिप देण्यात येते. यावर्षीपासून उद्योग व्यवसायात उल्लेखनीय (इनोव्हेटिव्ह) कार्य करणाऱ्या एकल महिलांना १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

यांचा झाला सन्मान

रुक्मिणी नागापुरे (सामाजिक), श्रद्धा नलमवार (क्रिडा प्रशिक्षक), संध्या नरे पवार (पत्रकारिता), कलावती संवडकर (कृषी), मीनाक्षी पाटील (साहित्य), राजश्री नागरे (उद्योजिका) या महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

म्हणून आमच्या तीन भावडांना पद्म पुरस्कार

आमच्या आईने आम्हा ७ भावडांच्या शिक्षणासाठी खडतर परिश्रम घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी आईचा दरारा होता. आईच्या परिश्रमामुळे आम्ही भावंडे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करू शकलो. यामुळे आम्हाला मी सत्तेत नसताना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. तर मला पद्मविभूषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मिश्‍किलपणे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com