Woman's Day : कृषी शिक्षणात मुलींचा टक्का वाढला

Agriculture Education : यंदा (२०२३-२४) विविध कृषी विद्यापीठांत पदवीसाठी प्रवेशीत ३ हजार ४९८ मध्ये मुलींची संख्या ९४१ (२६.९० टक्के) आहे.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक (शासकीय) आणि संलग्न (खासगी) महाविद्यालयामध्ये कृषी व संलग्न पदवी ते पीएचडी पर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.

यंदा (२०२३-२४) विविध कृषी विद्यापीठांत पदवीसाठी प्रवेशीत ३ हजार ४९८ मध्ये मुलींची संख्या ९४१ (२६.९० टक्के) आहे. पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेशीत ५१२ मध्ये २५१ (४९.०२ टक्के) मुली आहेत.

पीएचडीसाठी प्रवेशीत ६० मध्ये ३५ (५८.३३ टक्के) मुली आहेत. कृषी विभागासह प्रशासकीय सेवेतील नोकऱ्या तसेच कृषिपूरक व्यवसायाच्या संधींची शाश्वती असल्यामुळे कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांकडे मुलींचा कल वाढला आहे. गुणवत्तेमध्येही मुली सरस आहेत.

मराठवाड्यामध्ये (Marathwada) १९५६ परभणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन झाले. त्या वेळी कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या बोटावर मोजण्याइतकी देखील नसायची. काही वर्षांपूर्वी कृषी पदवी अभ्यासक्रम जणू काही मुलांची मक्तेदारी मानली जायची.

Agriculture Education
Women Empowerment : घरच्या शेतीविकासासह महिलांना दिले उद्योगांचे बळ

जेमतेम ५ ते १० मुली कृषी पदवीसाठी प्रवेश घेत असत. त्यातही उत्तर पूर्व आणि दक्षिणेतील राज्यातील मुलींची संख्या अधिक असे. कृषी अभ्यासक्रमासाठी १९८६ पासून मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये इयत्ता बारावी (विज्ञान) नंतर वैद्यकीय (मेडिकल), अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ग्रामीण-शहरी भागातील मुला-मुलींचा ओढा अधिक दिसत आहे.

त्यानंतर कृषी विभागासह प्रशासकीय सेवेतील नोकऱ्या तसेच खासगी कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बॅंका, विमा कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी आहेत. स्वयंरोजगार करता येतो. शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. याबाबींचा विचार घेऊन कृषी तसेच संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत १२ घटक (शासकीय) महाविद्यालय आहेत. तर ४३ संलग्न (खासगी) महाविद्यालये आहेत. कृषी, उद्यानविद्या, अन्नतंत्र, कृषी अभियांत्रिकी, समुदाय विज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम आहेत.परभणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २१० एवढी आहे.

Agriculture Education
Women Empowerment : महिलांची ग्लोबल भरारी

२००८-०९ मध्ये कृषी पदवीस प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या ५९ होती. २०१८-१९ मध्ये मुलींची संख्या १०४ पर्यंत वाढली आहे. यंदा (२०२३-२४) कृषी विद्यापीठातील विविध पदवीसाठी प्रवेशीत एकूण ३ हजार ४९८ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ९४१ (२६.९० टक्के) एवढी आहे.

त्यात कृषी पदवीसाठी प्रवेशीत ७३८ मुली, उद्यानविद्या पदवी ३७ मुली, अन्नतंत्र पदवीसाठी ५३, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीसाठी ४ मुली, जैवतंत्रज्ञान पदवीसाठी ७१ मुली, कृषी अभियांत्रिकी पदवीसाठी १४ मुलींनी प्रवेश घेतला आहे.

पदव्युत्तर पदवी कृषी साठी १९२ मुली, अन्नतंत्रसाठी ४, कृषी अभियांत्रिकीसाठी १३ मुली, जैवतंत्रज्ञानसाठी ७ मुली, समुदाय विज्ञानासाठी ५ मुली, कृषी व्यवसाय व्यवस्थापनासाठी ३० मुलींनी प्रवेश घेतला आहे. पीएचडी कृषीसाठी ३० व अन्नतंत्रसाठी ५ मुली प्रवेशीत आहेत.

‘वनामकृवि’अंतर्गत पदवी अभ्यासक्रम तुलनात्मक प्रवेश स्थिती

वर्षे...मुले...मुली...एकूण...मुलींची टक्केवारी

२०२१-२२...२४२०...८२१...३२४१...२५.३३

२०२२-२३...२५२४...९१३...३४३७...२६.५६

२०२३-२४...२५५७...९४१...३४९८...२६.९०

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तुलनात्मक प्रवेश स्थिती

वर्षे...मुले...मुली...एकूण...मुलींची टक्केवारी

२०२१-२२...२५८...२२६...४८४...४६.६९

२०२२-२३...२६२...१९५...४५७...४२.६६

२०२३-२४...२६१...२५१...५१२...४९.०२

पीएचडी पदवी तुलनात्मक प्रवेश स्थिती

वर्षे...मुले...मुली...एकूण...मुलींची टक्केवारी

२०२१-२२...२०...१७...३७...४५.९४

२०२२-२३...२४...२०...३४...५८.८२

२०२३-२४...२५...३५...६०...५८.३३

काही वर्षांपूर्वी केरळ व पूर्वोत्तर राज्यांतील मुली कृषी शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असत. कृषीसाठी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफी आहे. वसतिगृहाच्या सुविधा आहेत. कृषीसह बँका, विविध क्षेत्रांत नोकरी, रोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे कृषी तसेच जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलीची संख्या अधिक आहेत.
- डॉ. उदय खोडके, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता वनामकृवि, परभणी
वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच कृषी पदवीनंतर विविध विभागांत नोकरीच्या स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. ‘नाहेप’अंतर्गत मलेशिया देशाच्या अभ्यास दौरा केला. कृषी कीटकशास्त्रज्ञ विषयात संशोधनाचा मानस आहे.
- मोहिनी भोंडवे, विद्यार्थिनी, एम.एस्सी. कृषी कीटकशास्त्रज्ञ (द्वितीय वर्षे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com