Chhagan Bhujbal : मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोधच ; छगन भुजबळ आक्रमक

Maratha Reservation : मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या हिंसक घटनास्थळी मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalAgrowon
Published on
Updated on

Chhagan Bhujbal for reservation of Maratha : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापले आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात हालचाली सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Chhagan Bhujbal
Beed Violence : जाळलेलं घरं, फोडलेलं हॉटेल अन् राख झालेली गाडी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. त्याचवेळी बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.

पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले, मराठा समाजातील ज्या लोकांकडे नोंदी आहेत. त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही. पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करू नये. घटनेनुसार आरक्षण मिळत नाही. म्हणून मागच्या दरवाज्यातून इंट्री दिली जात आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळाले. तर त्यांना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात सुद्धा आरक्षण द्यावे लागणार आहे. एवढा मोठा समाज ओबीसीमध्ये आला तर माळी, कोळी, धनगर, वंजारी, तेली, तांबोळी, साळी समाजाचे आरक्षण धोक्यात येऊ शकते.

अगदी मंत्रालयापासून खालपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहेत. जात प्रमाणपत्र देण्यासाठी वर्षानुवर्षे लागत होती. आज जिल्ह्याजिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाची दुकाने सुरु केली आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी मंत्र्यांसोबत आरक्षण प्रश्नावर काम करणाऱ्या समितीचे अध्यक्ष असलेले न्यायाधीश जात असतील तर काय न्याय मिळणार, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला.

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षणातून नोकऱ्या मिळत नाहीत. आरक्षण समानता निर्माण करण्यासाठी आहे. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, अशी आक्रमक भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com