Swapnil Shinde
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले.
आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला करत आग लावली.
बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक करत पेटविण्यात आले होते.
या घटनेत हॉटेलचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांनी राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला.
या घटनेत सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
या प्रकरणी १४४ आरोपींना अटक तर २ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.