
Hingoli News : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट उपचार पद्धतीचा अवलंब करावा. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवला पाहिजे. त्यासाठी गाव शिवारात मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची कामे करावीत. गावांच्या लोकसंख्येनुसार ग्रामस्थांनी प्रति व्यक्ती दोन झाडे लावावीत. पाणलोट विकास क्षेत्र चळवळ व वृक्ष लावगड करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत पाणलोटविषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती व प्रसिध्दी करण्यासाठी मंगळवारी (ता. ११) डोंगरगाव (ता. सेनगाव) येथे केंद्र शासनामार्फत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे, सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच विलास ससेदे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, गट विकास अधिकारी सेनगाव, जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, जलसंधारण अधिकारी विठ्ठल काळबांडे आदींची उपस्थिती होती.
कदम म्हणाले, की भविष्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ हा शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळू शकणार नाही. यासाठी गावातील १०० टक्के शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावीत. डॉ. शेळके म्हणाले, की माती तपासणी करून घ्यावी. त्यानुसार पीक पद्धतीमध्ये बदल करता येईल.
या वॉटरशेड यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वॉटरशेड सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.जलयोद्धा व धारिणीताई यांनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्राचे वितरण करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.