Water Crisis : धाराशिवच्या चार प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित

Water Scarcity : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Water Scarcity
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी हा आदेश दिला.

तुळजापूर तालुक्यातील येमाई प्रकल्प, मंगरूळ प्रकल्प, आरळी आणि केमवाडी (सा.त.) या चार प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. परिणामी, या प्रकल्पांवरील पाणीपुरवठा योजनांचा विचार करता पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे.

Water Scarcity
Water Crisis : कवठेमहांकाळामधील अकरा तलाव कोरडे, म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

असे जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत उपकार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र. २, उमरगा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालातही या प्रकल्पांतील पाणीपातळी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Water Scarcity
Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

तसेच सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा अवैध उपसा होऊ नये, पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात आणि जनावरांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवण्याची सूचना

या पार्श्वभूमीवर पुजार यांनी या चारही प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील आदेश येईपर्यंत फक्त पिण्यासाठीच वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले. जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर बारीक लक्ष ठेवावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

आरक्षित प्रकल्प

येमाई

मंगरूळ

आरळी

केमवाडी (सा.त.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com