Rena Water Project : रब्बी पिकांसाठी दिलासा: रेणा प्रकल्पातून फेब्रुवारीत पाण्याचे आवर्तन

Agriculture Irrigation : यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे रेणा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाऊस पडला की अनेक वेळा नदीपात्रात पाणी सोडावे लागले.
Rena Water Project
Rena water ProjectAgrowon
Published on
Updated on

Latur News : तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात सध्या ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, जवळगा व खरोळा बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह उसाला मोठा आधार होणार आहे.

यावर्षी पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे रेणा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाऊस पडला की अनेक वेळा नदीपात्रात पाणी सोडावे लागले. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरीही आनंदीत झाले होते.

Rena Water Project
Agriculture Irrigation : निळवंडे कालव्यातून बुधवारपासून सुटणार पाणी

यातच रेणा नदीवरील चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपसा केला. परिणामी विविध बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Rena Water Project
Agriculture Irrigation : कोनड प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी दुसरेआवर्तन

त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रेणा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती शाखा अभियंता कुलकर्णी यांनी दिली.

रेणा मध्यम प्रकल्प सद्यःस्थिती

दलघमी उपयुक्त पाणीसाठा १५.७६१

दलघमी मृत पाणीसाठा १६.८९

पाण्याची टक्केवारी ७६.६७ टक्के

रेणा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याची टक्केवारी

रेणापूर बंधारा ५.६८ टक्के

जवळगा बंधारा १० टक्के

खरोळा बंधारा २२.४० टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com