Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’च्या ६२६ योजनांतून पाणीपुरवठा

Rural Water Supply Department : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापर्यंत जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांपैकी सुमारे ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापर्यंत जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांपैकी सुमारे ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. यातील ६२६ योजनांतून नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला. मेअखेर आणखी ५० योजना पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे टँकर कमी होणार असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाईबाबत आढावा बैठक कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी आयोजित केली होती. बैठकीस जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते, शाखा अभियंते, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स संस्था प्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार ४१० कोटींच्या एक हजार २२२ योजनांची कामे सुरू आहेत. या सर्व योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र, सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली.

१५ एप्रिलपर्यंत ६१७ योजनांची कामे पूर्ण केली होती व आता १८ मेपर्यंत ६८१ कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. पूर्ण झालेल्या ६२६ योजनांतून पाणीपुरवठा सुरू झाला. काही योजनांची १० ते २० टक्के कामे शिल्लक आहेत. ही कामे मेअखेर पूर्ण होतील. त्यामुळे टँकर कमी होण्यास मदत होईल, असे सोनवणे यांनी सांगितले. टाटा कन्सल्टिंगच्या प्रतिनिधींकडून आढावा घेण्यात आला.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : परभणीत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’चा जलरथ

६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण आहेत. १८ मेपर्यंत या तपासणी संस्थेने ३० लाखांवरील रकमेच्या १४७ पाणीपुरवठा योजनांची तपासणी केली असून, ३० लाखांच्या आतील ३० योजनांची दोन टप्प्यांत तपासणी केली आहे. यामुळे त्रयस्थ संस्थेच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेने मंजूर १२२२ पैकी केवळ १७७ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण असल्याचे दिसत आहे.

यासाठी त्रयस्थ संस्था प्रतिनिधींनी पाणीपुरवठा योजनांची तपासणी करावी, अशा सूचना सोनवणे यांनी बैठकीत दिल्या. सद्यःस्थितीत ६८१ योजना पूर्ण झालेल्या आहेत. मेअखेर ७०० हून अधिक योजनांचे काम पूर्ण झालेले दिसेल. ३० जूनपर्यंत एकूण ९३० योजनांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात योजनांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com