Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Jaljeevan Unfinished Works : जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४९६ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, त्‍यापैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
Water Issue
Water IssueAgrowon

Alibaug News : जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४९६ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, त्‍यापैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

वाढत्‍या तापमानाबरोबरच जिल्‍ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही वाढू लागल्‍याने योजनांची कामे कधी पूर्ण होतील, आणि कधी गावात पाणी येईल, याची प्रतीक्षा गाव-पाड्यातील ग्रामस्‍थांना आहे. काही गावांत टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुरा असल्‍याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते.

Water Issue
Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी कामांची नियमित माहिती घेण्यात येत असल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Water Issue
Water Crisis : अक्कलकोट तालुक्यातील ४९ गावे टंचाईग्रस्त

पूर्ण झालेल्‍या योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग

जलजीवन योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये एक हजार ४९६ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महिनाभरात ४९ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेल्‍या पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार-अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com