Sangli Drought Condition : २०११ च्या जनगणनेनुसार दुष्काळी भागात पाणी पुरवठा, मंत्री दखल घेणार का?

Jat Water Problem : जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना अत्यंत अन्यायकारक व कालबाह्य निकष लावले आहेत.
Sangli Drought Condition
Sangli Drought Conditionagrowon

Drought Condition Sangli : टँकरचे कालबाह्य निकष बदलून चालू लोकसंख्येच्या आधारावर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिला आहे, अशी माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवि-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

रवि-पाटील यांनी जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना अत्यंत अन्यायकारक व कालबाह्य निकष लावले आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ६५ गावे व ४५४ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे.

मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार टँकरने अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. तरीही निकषामुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोकभावना अत्यंत तीव्र आहेत. माणसी वीस लिटर पाणी दिले जाते. वापरायचे पाणी व जनावरांच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील जनतेच्या व्यथा मांडल्या.

पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, चालू लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला. तसेच जनावरे व अन्य वापरासाठी जादा पाणी देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावांना आणखी ५० टक्के जादा पाणी पुरवठा करण्याची आपण मागणी केली होती. मात्र किमान ३० टक्के जादा पाणी मिळणार असल्याचे रवी-पाटील यांनी सांगितले.

Sangli Drought Condition
Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर- सांगली महापुराचे थेट पाणी मराठवाड्याला मिळणार असा असेल प्लॅन

निकष बदला

सांगली जिल्ह्यातील अनेक तालुके फेब्रुवारीपासूनच दुष्काळाच्या छायेत सापडली आहेत. दरम्यान जत तालुक्यात सध्या ६५ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु या गावांना पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुरा होत असल्याने अनेक लोकांचे मोठे हाल होताना दिसत आहे.

यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार लोकांना पाण्याची व्यवस्था केली जात असल्याने पाणी पुरवठा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यावर राज्यकर्त्यांनी लवकर निर्णय घ्यावा अशी तालुकावासियांची मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com