Water Crisis : परभणी जिल्ह्यात २४ टँकरने पाणीपुरवठा

Water Issue : परभणी जिल्ह्यात जून महिन्यात मोठा पाऊस न झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टँकर २४ झाले असून खेपाही वाढल्या आहेत.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात जून महिन्यात मोठा पाऊस न झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टँकर २४ झाले असून खेपाही वाढल्या आहेत. अधिग्रहण केलेल्या विहिरींच्या संख्येत २१२ पर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.

सध्या जिंतूर तालुक्यातील १४ गावे व १ तांडा, गंगाखेडमधील १ गाव आणि ४ वाडी-तांडे, सोनपेठला १ गाव आणि १ तांडा, परभणीतील २ गावे असे मिळून जिल्ह्यातील १८ गावे आणि ६ वाड्या, तांडे मिळून एकूण २४ लोकवस्त्यांवर २४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या ४२ खेपा मंजूर असून प्रत्यक्षात २७२ खेपा झाल्या आहेत. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ८ तालुक्यांतील १६६ गावांतील २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात २४ विहिरी टँकरसाठी, तर १८८ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत.

Water Shortage
Water Crisis : ढोरेगावच्या शिवना पट्ट्यात पाणीप्रश्न गंभीर

गावे, कंसात संख्या :

परभणी तालुका : गोविंदपूर,सारंगपूर (१).

जिंतूर तालुका : ब्राह्मणगाव, मोहाडी, वाघी धानोरा, कोरवाडी, सावरगाव, सावरगाव तांडा, चाराठाणा, भोसी, हतवतखेडा, बोरी, धमधम, कान्हा. धानोरा, सायखेडा (१६).

सोनपेठ तालुका : उखळी, खपाट पिंपरी, माणिकनगर तांडा (२).

गंगाखेड तालुका : मसनेरवाडी, पोखर्णी तांडा, हनुमाननगर तांडा, घटांग्रा तांडा, गारमळ तांडा, लोभनाईक तांडा, बाळू नाईक तांडा (५)

विहिरी अधिग्रहण केलेली गावे, कंसात एकूण विहिरींची संख्या :

परभणी तालुका : दैठणा, पिंगळी कोथाळा, धोंडी, खानापूरतर्फे झरी, गोविंदपूरवाडी, सारंगपूर (६).

जिंतूर तालुका : वरुड नृसिंह, राजेगाव, गारखेडा, ब्राह्मणगाव, वाघी धानोरा, कोरवाडी, मोहाडी, सावरगाव, सावरगावतांडा, चारठाणा, भोसी, हनवतखेडा, बोरी, ताठापूर, जांभरून, पिंपळगाव काजळे तांडा, वझर बुद्रुक, नागठाणा, नांदगाव दुधना, बामणी, वडाळी, चांदज, वडी, कौसडी, जोगवाडा, बलसा, कोठा, धानोरा, कान्हा, साईनगरतांडा (५१).

Water Shortage
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

सेलू तालुका : कुंडी, सोनवटी, ब्राह्मणगाव, शिंदे टाकळी, आहेर बोरगाव, पारडी, वालूर, केमापूर, करडगाव, कण्हेरवाडी, सिमनगाव, रवळगाव (१२). मानवत तालुका ः सावरगाव खुर्द, वझूर खुर्द, रत्नापूर, मंगरूळ बुद्रुक, खरबा, रुढी, इरळद, देवलगाव (८).

सोनपेठ तालुका : बोंदरगाव, वाघलगाव, निमगाव, खपाट पिंपरी, तिवठाणा, वैतागवाडी, बुक्तरवाडी, उखळी बुद्रुक, गवळी पिंपरी, कोठाळा, उखळी, डिघौळ, डिघोळ ई., बोंदरगाव वस्ती, वाघलगाव, वडगाव अंतर्गंत मरगळवाडी, पारधवाडी अंतर्गंत लोकरवाडी, उंदरवाडी, नखातवाडी, पोहंडुळतांडा, हनुमाननगरतांडा, बंजारावाडी, माणिकनगर तांडा, डिखोळ रेवा तांडा (२२).

गंगाखेड तालुका : बेवाडी, मानकादेवी, बोर्डा, उखळी, लिंबेवाडी, डोंगरगाव, शेंडगा, बडवणी, वाघदरा, गौलवाडी, धनगरमोहा, सुरळवाडी, घटांग्रा, कातकरवाडी, पिंपळदरी, कुंडगीरवाडी, इळेगाव, डोंगरजवळा, रुमना, मसनेरवाडी, निळा नाईक तांडा, मसनेरवाडी, गोदावरी तांडा, चिलगरवाडी, बोथी, उंबरवाडी, डुमनरवाडी, आरबुजवाडी, दगडवाडी, मरसडसगाव, सांगळेवाडी, सायळ, वडवणी, डोंगरजवळा,खोकलेवाडी, पिंपळदरी, कातकरवाडी, नरळद, वाघदरा वाघदरा तांडा, पोखर्णीतांडा, बोर्डा हनुमाननगरतांडा, बोर्डा उमलानाईक तांडा, मरगळवाडी, सायबेटवाडी, काळीमातीतांडा, घटांग्रा तांडा, गारमाळतांडा, उमाटवाडी, कार्लेवाडी, बोथी तांडा, उंबरवाडी तांडा, थावरुनाईक तांडा, खंडाळी तांडा, धारासूर तांडा, वरवंटीतांडा, बाळूनाईक तांडा (८६).

पालम तालुका : तांबुळगाव,पेंडू बुद्रुक, बनवस, नरटवाडी, लोभनाईक तांडा, सर्फराजपूर, सोनेरीतांडा, मोजमाबाद, बेडकीतांडा,बोरगाव (११).

पूर्णा तालुका : धोतरा,दगडवाडी (२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com