Water Crisis : ढोरेगावच्या शिवना पट्ट्यात पाणीप्रश्न गंभीर

Water Shortage : भूजल पाणीपातळी प्रचंड खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे या भागातील पिके करपून जात आहे.
Sugarcane Crop
Sugarcane Crop Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव परिसरातील शिवना नदीमुळे बाराही महिने पाणी असलेला हा परिसर आहे. मात्र, या भागातील भूजल पाणीपातळी प्रचंड खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे या भागातील पिके करपून जात आहे.

यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीमुळे चारा, पाणी टंचाईच्या समस्या भेडसावत आहे. ढोरेगाव, पिंपळवाडी भागांत एप्रिल २०२४ पासून पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शेतीपिके जगविण्यासाठी शेतकरी लोकांनी अहोरात्र धडपड केली.

काहींनी बोअरवेल घेतले, विहिरी खोदल्या पण पाणी लागले नाही. पाण्याअभावी पिके करपली, बांधऱ्यावरची झाडे, फळबागा, वाळू लागली. जमिनीला भेगा पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेले.

Sugarcane Crop
Water Crisis : पालघरमध्ये पाणीटंचाईचे संकट

पण मृग नक्षत्राचा पाऊस तरी वेळेवर पडला तर पिकांना जीवनदान मिळेल. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने सध्या क्रेन मशिनच्या साहाय्याने गाळ काढण्यासह विहिरीतील खडक फोडण्याची कामे सुरू आहेत.

या वर्षी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. चाळीत भरून ठेवलेला कांदा चांगल्या भावाअभावी चाळीतच सडला, यामुळे शेतकऱ्याला शेती नकोशी झाली आहे. शेतातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहे.

Sugarcane Crop
Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

गंगापूर तालुक्याचा शिवना परिसर हा नदीमुळे सुजलाम सुफलाम असलेला परिसर म्हणून ओळखला जात होता. शिवना टाकली धरणापासून निघालेली नदी लासूर स्टेशन, आगाठाण भागाठाण, वडाळी, मेंढी भाळगाव, खोपेशवर, मालुजा, शिरजगाव, बोळेगाव, बाबरगाव, भोयगाव, पेंडापूर, ढोरेगाव सोलेगाव, पुरी,पखोरा या गावांपासून वाहत असल्याने या सर्व गावांमध्ये पाण्याच्या बाबतीत सुबत्ता होती.

मात्र, काही वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत कमी होऊन रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी, बोअरवेल काही मिनिटांवर येऊन ठेपल्या आहेत. शिवना पट्ट्यात शेतकऱ्यांनी ऊस, उन्हाळी बाजरी, कांदा तर गुरांसाठी चारा लागवड केलेली आहे.

चारा पिके वाचविण्यासाठी शेतकरी आतापासूनच विहिरींच्या कामाला लागले आहेत. काहींना विहिरीचे काम करूनही पाणी आलेले नाही. हातातील पैसा देखील खर्च झाल्याने बळीराजा हताश झाला आहे.

माझे पिंपळवाडी शिवारातील तीन एकर उसाचे पीक पाण्याअभावी सुकून गेले आहे. ऊस पीक जगविण्यासाठी बोअरवेल घेतले पण पाणी लागले नाही. आता आमच्या भागात चारा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्ञानेश्वर पठाडे, रा. ढोरेगाव, ता. गंगापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com