
Solapur News: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाची पाणीपातळी सध्या ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पाण्याचा विसर्ग आणि वेग पाहता पुढील २४ तासांत धरण ७० टक्क्यांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. परिणामी, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.२०) सकाळी दौंडकडून ५८ हजार ५८५ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.
उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. सध्या खडकवासला, गोड, चासकमान धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळेच गुरुवारपर्यंत धरणाकडे येणारा १५ ते १८ हजार क्युसेकचा विसर्ग शुक्रवारी (ता.२०) तब्बल ५८ हजार ५८५ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी धरणाची एकूण पाणीपातळी ४९४.९८० मीटरपर्यंत होती. तर एकूण पाणीसाठा ९६.९६ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ३३.३० टीएमसी एवढा राहिला. तर पाण्याची टक्केवारी ६२.१६ इतकी राहिली. पण वाढविण्यात आलेला विसर्ग आणि त्याचा वेग पाहता, पुढील २४ तासांत धरणाची पाणीपातळी ७० टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे.
वाढत्या विसर्गामुळे भीमा नदीला पूरस्थितीची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन भीमा नदीच्या पूर नियंत्रणासाठी वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक आणि सांडव्यातून १० हजार क्युसेक असे ११ हजार ६०० क्युसेक इतके पाणी भीमानदीमध्ये राहणार आहे. परिणामी, पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुससार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तरीही नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.