Water Scarcity : शिर्सुफळ येथील तलावातील पाणीसाठा संपला

Water Shortage : शिरसाई उपसा सिंचन योजना शिर्सुफळ (ता. बारामती) तलावातील पाणीसाठा संपल्यामुळे लाभार्थी गावांतील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Baramati News : शिरसाई उपसा सिंचन योजना शिर्सुफळ (ता. बारामती) तलावातील पाणीसाठा संपल्यामुळे लाभार्थी गावांतील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे खडकवासला प्रकल्प विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन २९ डिसेंबर रोजी लाभक्षेत्रात सोडण्यात आले होते. शिरसाई योजनेद्वारे उचलण्यासाठी २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येईल, असे आश्वासन खडकवासला प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कऱ्हाडे यांनी शिरसाईच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.

Water Scarcity
Water Scarcity : राज्यात पाणी टंचाई गंभीर वळणावर

त्यानुसार उपसा सिंचन विभाग व लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थेने नियोजन केले होते. यामध्ये ‘टेल टू हेड’ आवर्तन सुरू होते. मात्र ‘हेड’च्या गावात योजनेचे पाणी सुरु झाल्यानंतर शिर्सुफळच्या साठवण तलावातील पाणीसाठा संपला. त्यामुळे योजना बंद पडली आहे.

बारामतीच्या जिरायती भागातील कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर आदी गावातील काही भाग योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी व पाणी वापर संस्थानी खडकवासला कालव्याच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Water Scarcity
Water Scarcity : सातारा जिल्ह्यात टँकरच्या संख्येत वाढ

पाटबंधारे’च्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार

याबाबत उंडवडी कपचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मंजूर कोट्याप्रमाणे तलावात पाणी सोडलेले नाही. तलावामध्ये पाणी असतानाही तसेच पंप बंद करण्याबाबत कुठलेही आदेश नसताना पंप बंद केले आहेत. याची तत्काळ दखल घेऊन पंप सुरू करण्याबाबतचे आदेश द्यावेत आणि या प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी जराड यांनी तक्रारीत केली आहे.

आम्हाला शिरसाई योजनेतून २५० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यासाठी देणार, असे आश्वासन खडकवासला प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी दिले होते; मात्र प्रत्यक्षात २३५ दशलक्ष घनफूटच पाणी उचलण्यास दिले. त्यामुळे आमचे नियोजन कोलमडले आहे. दोन-तीन दिवस योजना सुरू राहिली असती, तर सर्व गावात आवर्तन पूर्ण झाले असते. शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना पाणी देता आलेले नाही.
- मधुकर भोसले, अध्यक्ष, तुकाईमाता पाणी वापर संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com