Water Scarcity : जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर

Water Issue : अपेक्षित पाऊस न झालेल्या मराठवाड्यात आता हळूहळू टंचाईची दाहकता वाढू लागली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : अपेक्षित पाऊस न झालेल्या मराठवाड्यात आता हळूहळू टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. त्याचे चटके सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात बसत असून अंशतः बीड जिल्ह्यातही टंचाईने डोके वर काढले आहे. जवळपास १८० गावे व ४२ वाड्यांमध्ये टंचाई निवारण्यासाठी २६५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पावसाळ्यात मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे आधी खरिपात पीक पावसाअभावी हाताची गेली. रब्बी हंगामावरही सुरुवातीला पावसाअभावी व नंतर अति पावसाने संकट ओढावले. वेळ चुकून पडलेल्या अवेळी पावसामुळे टंचाईचे संकट थोडे लांबले.

Water Crisis
Water Crisis : कांदापीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मात्र आता ती टंचाई डोके वर काढताना दिसते आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, जिल्ह्यात आताच्या घडीला सर्वाधिक गाववाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११७ गाव व १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, त्यासाठी १४४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील ६२ गावे व २५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, त्यासाठी १२० टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. बीड जिल्ह्यातील एक गाव व तीन वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, त्यासाठी एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, कन्नड या तालुक्यात पाणीटंचाई जाणवते आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, घनसांगवी मंठा जाफराबाद या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

Water Crisis
Water Crisis : कृष्णा नदी पुन्हा कोरडी

३४४ विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यासोबतच टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जवळपास ३४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ८६, जालना १०२, परभणी ५२, नांदेड २, बीड १४ तर धाराशिव जिल्ह्यात ५५ अधिग्रहित केलेल्या विहिरींचा समावेश आहे.

तालुकानिहाय अधिग्रहित विहिरी

छत्रपती संभाजीनगर २, फुलंब्री २५, पैठण ३, गंगापूर १२, वैजापूर १७, खुलताबाद ३, कन्नड ७, सिल्लोड १७, जालना ३४, बदनापूर २२, भोकरदन २९, जाफराबाद ४, मंठा १२, अंबड ६, घनसांगवी २२, परभणी १३५, गंगाखेड २१, पालम १४, सेलू ६, जिंतूर ११, कंधार २, गेवराई ४, वडवणी ५, माजलगाव ५, धाराशिव २७, लोहारा ५, कळंब २३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com