Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

गेल्यावर्षी मॉन्सून हंगामावर एल निनोचा परिणाम झाला. त्यामुळं पावसाचे मोठे खंड पडले. परिणामी धरणं पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यात उष्णतेच्या लाटांनी पाणीसाठा झपाट्याने कमी होत गेला.
Koyna Dam
agrowon

देशातील बहुतांश भागात दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ लागल्या आहेत. देशातील प्रमुख १५० धरणांमध्ये मेच्या तिसऱ्या आठवड्यात एक चतुर्थांश पाणीसाठा शिल्लक असल्याचं सेंट्रल वॉटर कमिशनच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. सलग ३२ व्या आठवड्यात पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचं संकट अधिक गहिरं झालं आहे.

गेल्यावर्षीचा मॉन्सूनचा फटका

गेल्यावर्षी मॉन्सून हंगामावर एल निनोचा परिणाम झाला. त्यामुळं पावसाचे मोठे खंड पडले. परिणामी धरणं पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यात उष्णतेच्या लाटांनी पाणीसाठा झपाट्याने कमी होत गेला. उत्तर आणि पश्चिम भारतातील धरणांचा पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा खाली घसरला. तर दक्षिण भारतातील धरणांची पाणी पातळी १५ टक्क्यांपेक्षा खाली आली. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासोबत शेती पिकांना पाणी टंचाई भासू लागलीय.

राज्यनिहाय परिस्थिती

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये धरणातील पाणीपातळी सरासरी ६ टक्क्यांवर आली आहे. तर तामिळनाडूमध्ये धरणाची पाणीपातळी सरासरी १७ टक्के तर कर्नाटकमध्ये १४ टक्क्यांवर आहे. बिहारमध्ये एक धरण कोरडं ठाक पडलं. तर उत्तराखंडमध्ये नानक सागर धरण कोरडं पडलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी सरासरी ७ टक्क्यांवर आली. महाराष्ट्रात धरणातील पाणीसाठा क्षमतेच्या सरासरी २१ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट अधिक गंभीर झालं आहे.

Koyna Dam
India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

दरम्यान, राज्यातील गाववाड्यावर टँकरची एकूण संख्या ३ हजार ४५५ वर पोहचली आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष मॉन्सूनकडे लागून आहे. हवामान विभागाने मॉन्सून हंगामात सरासरी १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com