Water shortage : पाणी, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू 

Nashik Scarcity Control Room : गेल्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. यादरम्यान नाशिक जिल्हा प्रशासनाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. 
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Nashik/Pune : नाशिक जिल्ह्यात भेडसावणाऱ्या चारा-पाणीच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच ग्रामीण भागात भीषण चारा-पाणी टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात 'टंचाई नियंत्रण कक्ष' सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. तर या कक्षासाठी ०२५३-२३१७१५१ हा दूरध्वनी क्रमांक असेल, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, “जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने, काही भागात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी आणि चाऱ्यावर सर्व उपाययोजना प्रशासन करत असून याआधीच शेतीसाठी पाणी उचलण्यावर बंदी घातली आहे. तर सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्या बाहेर होणाऱ्या चाऱ्याच्या वाहतुकीवर बंदी घातली होती. तलाव, कालव्यांसह धरणांवर असणाऱ्या थ्री-फेज मोटरींचा वीजपुरवठा २२ तास अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पण सिंगल-फेज वीजपुरवठा अखंड सुरू राहील. या भागातील थ्री-फेज मोटरला सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा होणार नाही. यामुळे ग्रामस्थांनी पाण्याच्या उपसा करण्यासाठी मोटर पंप किंवा इतर कोणत्याही यंत्राचा वापर करू नयेत", असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.

Water Shortage
Water Shortage : राज्यात पाणी टंचाईचे चटके; छ. संभाजी नगरमधील धरणांचा पाणीसाठा २० टक्क्यांवर, टँकरही वाढले

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाई असणाऱ्या गाव आणि वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व २४ धरणातील पाणीसाठा ३१.३१ टक्के शिल्लक आहे. यात ७ मोठी आणि १७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात २०८ गावं आणि ४७२ वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई भासत असून येथे २१० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. या २१० टँकरपैकी सरकारी १४ टँकर आहेत.

Water Shortage
Water shortage : छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळला पाणी टंचाईच्या झळा; मुंबईकरांच्या चिंतेतही वाढ
जिल्ह्यात २०१७-१८ साली पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करून आधीच पाणी पुरवठ्यासाठी ४५० टँकरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर विहिरींचे अधिग्रहण ही वाढवण्यात जाईल. बालेगांव, नांदगाव आणि येवला विभागात पाणी टंचाईची भीषणता अधिक असून येथे जलजीवन मधील कामांना वेग देण्यात येत आहे. 
निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ

सर्वात प्रभावी तालूका हा नांदगांव असून येथे ४७ गावे आणि २२२ वाड्या वस्त्यांवर ४९ टँकर फिरवले जात आहेत. तसेच येवल्यात देखील पाणी टंचाईची भीषण स्थिती असून येथील ५२ गावे आणि २५ वाड्या वस्त्यांवर ४५ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 

दरम्यान जिल्ह्यात तीव्र उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता असून जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या मदतीने सप्टेंबर महिन्यात चारा वाहतूक बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रशासनाने आतापर्यंत विविध गावांतील ६४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com