Water Issue : सांगलीतील १८ तलावांत पाण्याचा ठणठणाट

Water Shortage : सांगली जिल्ह्यात मध्यम ५ व लघू ८७ असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. त्यापैकी १८ तलाव कोरडेठाक पडले आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात मध्यम ५ व लघू ८७ असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. त्यापैकी १८ तलाव कोरडेठाक पडले आहेत. तर १५ तलावांनी मृतसाठा गाठला आहे. उपयुक्त पाणीसाठा अवघा १८ टक्के इतका आहे. मागील वर्षी या वेळी हा साठा ३३ टक्के होता. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा ५० टक्क्यांनी घटला आहे. मे महिन्यात जिल्ह्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होईल.

जिल्ह्यात ८३ प्रकल्प असून त्यांची एकूण पाणी साठवण क्षमता ९ हजार ४४० दशलक्ष घनफूट आहे. त्यापैकी १ हजार ५८७ दशलक्ष घनफूट हा मृत पाणीसाठा आहे. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे हे प्रकल्प शंभर टक्के भरले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबरपासून पाणीटंचाई जाणवू लागली. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

Water Scarcity
Water shortage : टँकरच्या विळख्यात राज्य; एकाच दिवसात वाढले ४१ टँकर

तासगावमध्ये ५ टक्के, जत तालुक्यात ६ टक्के आणि मिरजमध्ये ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या तीनही तालुक्यांतील प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे तासगाव, जत आणि मिरज या तीन तालुक्यांत पाण्याची गंभीर स्थिती उद्‍भवली आहे. गतवर्षी याच वेळी ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात प्रकल्पात २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. एका महिन्यात ३ टक्क्यांनी उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात १ हजार ३८३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. कडेगाव तालुक्यात ७ प्रकल्प आहेत. गतवर्षी या प्रकल्पांत ५६ टक्के पाणीसाठा होता. यंदा ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यात पाणीटंचाई नाही.

Water Scarcity
Water Crisis : मराठवाड्यात ८६० गावे, २८३ वाड्यांना टंचाईच्या झळा

जत तालुक्यात २७ प्रकल्प असून त्याची साठवण क्षमता ३ हजार ६२८ दशलक्ष घनफूट आहे. २ हजार ९८७ दशलक्ष फूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. गतवर्षी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा होता. या वर्षी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अवघा सहा टक्के पाणीसाठा आहे. तर १२ तलाव कोरडे पडले आहेत.

मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्के

तासगाव ७ २९.५९ ५

खानापूर ८ ११२.२१ २०

कडेगाव ७ २७७.८० ४४

शिराळा ५ २०६.६४ २३

आटपाडी १३ ४४५.२२ ३८

जत २७ १६७.९७ ६

कवठे महांकाळ ११ १३०.८८ १६

मिरज ३ ९७४ ८

वाळवा २ ३.६५ ७

एकूण ८३ १३८३.७० १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com