Water shortage : टँकरच्या विळख्यात राज्य; एकाच दिवसात वाढले ४१ टँकर

Water Crisis : राज्याची वाटचाल पाणीटंचाईकडे सुरू असून राज्यात सध्या २९९४ सर्व धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३०.७६ टक्के शिल्लक असून मोठ्या १३८ धरणांमध्ये फक्त २९.४७ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे राज्यावर पाणीबाणी येण्याची शक्यता आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : राज्यात विविध जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटले असून प्रमुख धरणांसह सर्व धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारी प्रमाणे राज्यातील २९९४ सर्व धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३०.७६ टक्के शिल्लक असून मोठ्या १३८ धरणांमध्ये फक्त २९.४७ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे राज्यावर पाणीबाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

राज्यात सर्वाधिक बिकट स्थिती मराठवाड्यात असून येथील ४४ धरणातील पाणीसाठा १४.४९ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ५२.०९ टक्के होता. तर छ. संभाजीनगरमधील आपेगाव आणि पैठणचे जायकवाजी धरणात क्रमश:  ३१.७१ आणि १०.६७ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीत गेल्या वर्षी याच दिवशी ५२.३६ टक्के पाणीसाठी शिल्लक होता. 

Water Crisis
Pune Water Shortage : पुणेकरांच्या चिंतेत भर!; घटणारा पाणीसाठा अन् नीरा धरणाच्या उजव्या कालव्याला गळती

मराठवाड्यातील ८६० गावे व २८३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन बसत असून येथे बुधवार (ता.२४) पर्यंत १३१६ टँकर सुरू होते. तर प्रशासनाच्यावतीने १७७५ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले असून १२६६ टँकरच्या फेऱ्या सुरू होत्या. यात एका दिवसात ४१ टँकरची वाढ झाली झाली आहे. मराठवाड्यातील भूजलसाठा खोल जात असून दिवसेंदिवस टंचाईचे चटके गाव व वाड्यांना बसत आहे. सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्याला बसत आहेत.

Water Crisis
Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्याला पाणी टंचाईची शक्यता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरूवारी ५६९ टँकर फिरवले जात असून हा आकडा बुधवारी ५५६ होता. जालन्यात देखील १० टँकर वाढले असून आज येथे ३९९ टँकर प्रशासनाकडून फिरवले जात आहेत. बीडमध्ये सध्या २६३ टँकर लागत असून यात सुदैवाने वाढ झालेली नाही. धाराशिवमध्ये देखील ५ टँकरची वाढ झाली असून येथील ६२ गावांना ९७ टँकर लागल आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील ८३६ गावे आणि २८४ वाड्यावस्त्यांमध्ये सध्या पाण्याचे दुर्भीक्ष आहे. तर परभणी जिल्ह्यात देखील आता पाण्याचे संकट गडद होत असून येथे ४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे सध्या प्रशासनाकडून ४ टँकर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सध्या मराठवाड्यासह राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने १७७५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये ६२२ विहिरींचे टँकरसाठी आणि ११५३ विहिरी टँकर व्यतिरिक्त करण्यात आले आहे. विहिरींचे सर्वाधिक अधिग्रहीत हे धाराशिव जिल्ह्यात करण्यात आले आहे. बुधवारच्या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात ५६७ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापाठोपाठ जालना-३६६, छत्रपती संभाजीनगर-२६८, बीड-२५४, लातूर-१८८, नांदेड -५४, हिंगोली-४३ आणि परभणीत ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com