Women Movement
Women MovementAgrowon

Women Movement : कांदळवनच्या संरक्षणासाठी महिलांचे आंदोलन

Kalawal Khadi Sand : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावल खाडीपात्रातील वाळू उपशामुळे कांदळवन धोक्यात आले असून वाळूउपसा कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी तळाशील (ता. मालवण) येथील ५० हून अधिक महिलांनी खाडीत उतरून आंदोलन केले.
Published on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावल खाडीपात्रातील वाळू उपशामुळे कांदळवन धोक्यात आले असून वाळूउपसा कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी तळाशील (ता. मालवण) येथील ५० हून अधिक महिलांनी खाडीत उतरून आंदोलन केले. हे आंदोलन दहा तास सुरू होते. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने महिलांनी उपोषण स्थगित केले.

मालवण तालुक्यातील आचरा खाडीत मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत आहे. या वाळू उपशामुळे कांदळवन धोक्यात येत असल्याची तक्रार तळाशील येथील महिलांनी केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे कांदळवन संरक्षणासाठी महिलांनी खाडीपात्रातच उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

Women Movement
Sugarcane Harvester Subsidy : 'ऊस तोडणी यंत्रास सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच'

तळाशील खाडीमध्ये ५० अधिक महिलांनी पाण्यातच उपोषण सुरू केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. महिलांनी उपोषण सुरू करताना जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान एका महिलेची प्रकृती खालावली.

Women Movement
Honey : आता मुंबईकरांना मिळणार मधाचा गोडवा; बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात मध विक्री केंद्र सुरू

त्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर महिला खाडीतून बाहेर आल्या.

उपोषण स्थगित केल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, महिलांनी तब्बल दहा तास पाण्यात राहून उपोषण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com