Maharashtra Animals : महाराष्ट्रातील २ कोटी जनावरांना पाणी टंचाईच्या झळा, दुष्काळाने दुभती जनावरे आटली

Water Shortage Animals : राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असुनही सरकारने म्हणावी तशी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत आहे.
Maharashtra Animals
Maharashtra Animalsagrowon

Maharashtra Drought : महाराष्ट्रात ४० तालुक्यातील अनेक मंडळात दुष्काळ असल्याने जनावरांच्या चारा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अद्याप जून महिना बाकी असल्याने पाण्याची आणखी परिस्थीती भीषण होण्याची शक्यता आहे. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असुनही सरकारने म्हणावी तशी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप होत आहे. अशातच पशुधनाच्या दुधाचा प्रश्न आणखी बिकट होत चालला आहे.

राज्यात गाई-म्हशींसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ३ कोटी २० लाख १२ हजार आहे. त्यातील साधारण दोन कोटी जनावरांना चारा आणि पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. जनावरांसाठी पाणी मिळविताना दुष्काळी भागातील पशुपालक जेरीस आल्याचे अनेक भागातील चित्र पहायला मिळत आहे. जनावरांना पाणी मिळत नसल्याने दुभती जनावरे आटत आहेत.

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील महसूल मंडळात शासनाने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा या संदर्भात विविध उपाय योजना केल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये चाऱ्याबाबत नियोजन केल्यामुळे चारा टंचाईवर मात करण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे.

पाणीटंचाई निर्माण झालेल्या राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत कोट्यवधी लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. मात्र जनावरांच्या पाण्यासंदर्भात शासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणारे ओढे, तलाव गावातला बाजार तलाव यासह अन्य स्रोत बहुतेक ठिकाणी कोरडे पडलेले आहेत. प्रसंगी जनावरांच्या पाण्याबाबत मात्र भटकंती करावी लागत आहे.

Maharashtra Animals
Kharip Crop Kolhapur : खरिपाच्या पेरणीला घरच्या बियाणातून आता फुटणार नवे अंकूर

पशुवैद्यकांच्या नियमानुसार मोठ्या जनावरांना साधारणपणे दर दिवसाला ३० लिटर, लहान जनावरांना १५ लिटर तर शेळ्या-मेंढ्या १० लिटर पाण्याच्या गरजेनुसार राज्यात दररोज मोठ्या जनावरांसाठी ५७ कोटी ६२ लाख लिटर, शेळ्या मेंढया व इतर जनावरांना २० कोटी लिटर पाण्याची गरज आहे.

नगर : ३० लाख ४० हजार, अकोला : ४ लाख २१ हजार, अमरावती : ९ लाख ८५ हजार, छत्रपती संभाजीनगर : ११ लाख ३४ हजार, बीड : १२ लाख ५५ हजार, भंडारा : ५ लाख ७ हजार, बुलडाणा : १० लाख ५८ हजार, चंद्रपूर : ७ लाख १२ हजार, धुळे : १२ लाख ७१ हजार, गडचिरोली : ७ लाख ९० हजार, गोंदिया : ५ लाख ६० हजार, हिंगोली : ४ लाख ६६ हजार, जळगाव : १३ लाख १४ हजार, जालना : ८ लाख ३० हजार, कोल्हापूर : १० लाख ६० हजार, लातुर : ६ लाख ९२ हजार, नागपूर : ७ लाख ५७ हजार, नांदेड :११ लाख, नंदुरबार : ७ लाख २५ हजार, नाशिक : १९ लाख १९ हजार, धाराशिव : ७ लाख ५५ हजार, पालघर : ३ लख ९० हजार, परभणी : ५ लाख ७९ हजार, पुणे : १९ लाख ८३ हजार, रायगड : ३ लाख २७ हजार, रत्नागिरी : ३ लाख १० हजार, सांगली : १३ लाख ५१ हजार, सातारा : ११ लाख ८५ हजार, सिंधुदुर्ग : १ लाख ८७ हजार, सोलापूर : २२ लाख ८५ हजार, ठाणे : २ लाख २१ हजार, वर्धा : ४ लाख ६८ हजाार, वाशीम : ३ लाख ५२ हजार, यवतमाळ : १० लाख १३ हजार.

संगमनेर तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी दूध व्यवसाय, पशुपालनाला प्राधान्य देत आहेत. आमच्या सावरगाव तळ गावांत दर दिवसाला पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन होते. यंदा बहुतांश भागात दुष्काळामुळे पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्याची उपाययोजना नसल्याने आम्हा पशुपालकांना जनावरांच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

राज्यातील पशुधनाची संख्या

गाई : १ कोटी ३७ लाख ७५ हजार ८२१

म्हशी : ५४ लख ३२ हजार ०२८

मेंढ्या : २६ लाख २३ हजार ७५४

शेळ्या : १ कोटी ६२ हजार ८२७

इतर : १ लाख १७ हजार ६३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com